ETV Bharat / bharat

NEWS TODAY दिवसभरात 'या' महत्त्वाच्या बातम्यांवर राहणार नजर - SBI job last date application

देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. जाणून घ्या, राज्यासह देशभरातील अशा महत्त्वाच्या बातम्या.

news today
news today
author img

By

Published : Jul 26, 2021, 5:56 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात ते महापूर तसेच भूस्खलानामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून बाधितांच्या छावणीला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे बाधितांना मदतीचे वाटप करून महापुराने झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

संग्रहित
संग्रहित

कारगिल युद्धाला आज 22 वर्षे पूर्ण होत असताना वीर जवानांचे स्मरण केले जात आहे. कारगीलच्या युद्धात 26 जुलै 1999 रोजी भारताला विजय मिळाला होता. या स्मरणार्थ दर वर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. कारगिलमधील मोठ-मोठ्या शिखरांवर पाकिस्तानी घुसखोरांनी ताबा मिळवला होता. यानंतर भारताने 'ऑपरेशन विजय' आखून या घुसखोरांना येथून पिटाळून लावले होते. तब्बल 80 दिवस चाललेले हे ऑपरेशन विजय भारताच्या विजयानंतर संपले.

संग्रहित
संग्रहित

सोमवारी देशभरात २२ वा कारगिल विजय साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे द्रासला भेट देणार आहेत. सर्वोच्च त्याग आणि शौर्य दाखविणाऱ्या शहीद जवानांना कारगिल युद्ध स्मारक येथे अभिवादन करणार आहेत.

संग्रहित
संग्रहित

प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्न व शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीने पत्रव्यवहार केला होता. मात्र दोन वर्षात प्रशासनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे 26 जुलैला दुपारी 3 ते 5 या कालावधीत शिक्षक समितीने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

संग्रहित
संग्रहित

भारतीय महिला हॉकी संघाचा 26 जुलैला जर्मनी संघासोबत सामना होणार आहे.

संग्रहित
संग्रहित

ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने वर्षभरातून आयोजित करण्यात येणारा प्राईम डे सेल जाहीर केला आहे. हा सेल 26 ते 27 जुलैला होणार आहे. या दोन दिवसांमध्ये लघू आणि मध्यम व्यवसायांसह आघाडीच्या ब्रँडकडून नवीन उत्पादने लाँच करण्यात येणार आहेत.

संग्रहित
संग्रहित

कर्नाटकात भाजप सत्तेत येऊन 26 जुलैला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ही बैठक बोलविण्यात आली आहे. यावेळी भोजन समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यानंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन राजीनामा देऊ शकतात.

26 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

संग्रहित
संग्रहित

एसबीआयमध्ये अप्रेंटिस पदासाठी नोकर भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 26 जुलै 2021 रोजी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दिली आहे . एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

संग्रहित
संग्रहित

साऊथ कोरियन स्मार्टफोन मेकर सॅमसंगचा गॅलेक्सी एम 21 2021 एडिशन भारतीय बाजारात लॉन्च झाला आहे. या हँडसेटचा पहिला सेल 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरु होईल. अॅमेझॉन इंडियावरील प्राईम डे सेल ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.