बंगळुरू - गेल्या दोन आठवड्यांमध्ये कर्नाटकमधील कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले होते. असले तरी अचानक कर्नाटकमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता कर्नाटक सरकारने केरळ आणि महाराष्ट्रामधून राज्यात येणाऱ्या नागरिकांना आरटी-पीसीआरची निगेटिव्ह चाचणी बंधनकारक केली आहे.
कोरोना लशीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना निगेटिव्ह आरटी-पीसीआरची चाचणी बंधनकारक नव्हती. मात्र, कर्नाटक सरकारने यापुढे सर्वच नागरिकांना कर्नाटकमध्ये येण्याकरिता आरटी-पीसीआरची निगेटिव्ह चाचणी बंधनकारक केली आहे. कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच्या 72 तासांमध्ये घेण्यात आलेली आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. ही माहिती कर्नाटकच्या आरोग्य विभागाचे आयुक्त त्रिलोक चंद्रा यांनी दिली.
हेही वाचा-बलात्कार प्रकरणी गोव्यात दोघांना अटक
कर्नाटकमधील या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे वाढले प्रमाण-
गेल्या काही आठवड्यांपासून दक्षिण कन्नड, छमराजनगर, चिकमंगळुर आणि हसन येथे कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भागांमध्ये कोरोनाच्या चाचण्याचे प्रमाण आरोग्य विभागाने वाढविले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरू असल्याचेही आरोग्य आयुक्तांनी सांगितले. राज्यांच्या सीमांवर तपासणी करण्यात येत आहे.
हेही वाचा-ममता बॅनर्जींनी शरद पवारांची दिल्लीत घेतली भेट, 'ही' झाली चर्चा
तिसऱ्या लाटेचे नियंत्रण करणे हे लोकांच्या हातात
तज्ज्ञांच्या मते कर्नाटकच्या शेजारील राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सणांनिमित्त बाहेरील राज्यांमधून कर्नाटकमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांवर निर्बंध लागू करायला हवेत. याबाबत बोलताना आरोग्य आयुक्त त्रिलोक चंद्र म्हणाले, की कोरोनाच्या काळातील नियमांचे पुजेच्या ठिकाणी कठोर पालन करायला पाहिजे. जर येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढले तर टास्क समिती ही कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा करणार आहे. तिसऱ्या लाटेचे नियंत्रण करणे हे लोकांच्या हातात आहे. लोकांनी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायला हवे.