ETV Bharat / bharat

NCP Political Crisis : राष्ट्रवादीचं घड्याळ कुणाचं? काका-पुतण्याचं भवितव्य ठरणाऱ्या आज 'या' दोन आहेत महत्त्वाच्या सुनावणी - MLAs disqualification election commission hearing

NCP Political Crisis : राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे, तसेच आज सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटानं दाखल केलेल्या आमदारांच्या अपात्रता याचिकेवरही सुनावणी पार पडणार आहे.

NCP Political Crisis
NCP Political Crisis
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 8:16 AM IST

Updated : Oct 9, 2023, 8:29 AM IST

नवी दिल्ली NCP Political Crisis : महाराष्ट्रातील जनतेनं अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा एकदा अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला. अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही शिवसेनेप्रमाणं दोन गटांत विभागली गेली. एक राष्ट्रवादी शरद पवारांचा गट आणि दुसरा अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांचा गट आमने-सामने आहेत. त्यामुळं शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडानंतर अनुभवलेल्या सर्व गोष्टी महाराष्ट्र पुन्हा एकदा अनुभवतोय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार याप्रकरणी आज दोन महत्त्वाच्या सुनावण्या पार पडणार आहेत. पहिली सुनावणी म्हणजे शरद पवार गटानं दाखल केलेली अजित पवार गटाविरोधात सर्वोच्च न्यायालयातील याचिका आहे. तर दुसरी सुनावणी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात होणार आहे.

आज होणार सुनावणी : निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाचं? याबाबत आज सुनावणी पार पडणार आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटानं शरद पवारांनी हुकूमशाही पद्धतीनं पक्ष चालवला, असा युक्तीवाद करत परस्पर पत्र काढून शरद पवार नियुक्त्या करत होते, असा आरोप केला होता. तर शरद पवार गटानं पक्षाचं चिन्ह गोठवू नये, अशी मागणी निवडणूक आयोगासमोर केलीय. त्या पार्श्वभूमीवर आजच्या दोन्ही सुनावणींकडं संपुर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

शरद पवार गटानंतर अजित पवार गटही सर्वोच्च न्यायालयात : शरद पवार गटानंतर आता अजित पवार गटानंही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आलंय. शरद पवार गटानं यापुर्वीच आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याविरोधात अजित पवार गटानं काल हे कॅव्हेट दाखल केलंय. शरद पवार गटाच्या याचिकेवर निर्णय घेण्याआधी न्यायालयात अजित पवार गटाची बाजू ऐकून घेण्यात यावी, यासाठी हा कॅव्हेट दाखल करण्यात आलाय.

हेहा वाचा :

  1. Ajit Pawar Group In SC : शरद पवार गटानंतर अजित पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव; सोमवारी सुनावणी?
  2. Dispute In NCP : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदावरून दोन्ही गटातून 'तू तू मै मै'
  3. NCP Maharashtra Politics : राष्ट्रवादीत खरंच बंडखोरी झाली का? शरद पवारांच्या पुतण्यावरील विधानावरून राजकीय चर्चांना उधाण

Last Updated : Oct 9, 2023, 8:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.