ETV Bharat / bharat

अन्नदात्याच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका - शरद पवार - शेतकरी आंदोलन

शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्याचा सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशी विनंती आणि सुचना मी केंद्र सरकारला करतो, असे शरद पवार म्हणाले.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 11, 2020, 4:49 PM IST

Updated : Dec 11, 2020, 4:57 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी आज मुंबईत बोलताना शेतकरी आंदोलनावर वक्तव्य केले. शेतकरी आंदोलनाचे लोन देशातील इतर भागात पसरेल, फक्त दिल्लीपर्यंत सीमीत राहणार नाही, अशी शक्यता आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्याचा सहशनशीलतेचा अंत पाहू नका, अशी विनंती आणि सुचना मी केंद्र सरकारला करतो, असे शरद पवार म्हणाले.

शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले शरद पवार?

'शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या तीन कृषी कायद्यासंबंधीच्या आहेत. जेव्हा हे कायदे संसदेत मांडण्यात आले होते. तेव्हा घाईघाईने हे कायदे मंजूर करण्यात आले. १५ ते २० मिनीटांच्या अंतराने तिन्ही कायदे मंजूर करण्यात आले. नाममात्र, चर्चा करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांकडून यावर प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले असतानाही हे कायदे मंजूर करण्यात आली. त्यामुळे या कायद्यांवर फेरविचार करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आधी कायदे मागे घ्या त्यानंतर चर्चाकरून तोडगा काढू, असे शेतकरी म्हणत आहेत. मात्र, केंद्र सरकार त्यास तयार नाही. त्यामुळे हा संघर्ष आणखी काही काळ चालेल, असे दिसत असल्याचे शरद पवार म्हणाले.

आज मला असं समजलं की सुमारे सातशे ट्रॅक्टरमधून विविध भागांतील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत आले आहेत. जर यावर लवकर तोडगा निघाला नाही तर हे आंदोलनाचे लोन देशातील इतर भागात पसरेल असे शरद पवार म्हणाले.

शरद पवारांसह विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट

विरोधी पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने बुधवारी ( ९ डिसेंबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेत शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी राजा, सीपीएम पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. कृषी कायदे रद्द करण्याचे निर्देश राष्ट्रपतींनी सरकारला द्यावे, अशी विनंती सर्व नेत्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.

Last Updated : Dec 11, 2020, 4:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.