ETV Bharat / bharat

Navjot Singh Sidhu released : तब्बल दहा महिन्यानंतर नवजोत सिंग सिद्धू जेलबाहेर; कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत - नवजोत सिंह सिद्धू काय प्रकरण

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची आज तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. याबद्दल सिद्धू यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली होती. त्यांच्या सुटकेनंतर पटीयाला जेलबाहेर कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या जल्लोशात स्वागत केले आहे.

Navjot Sidhu Release
Navjot Sidhu Release
author img

By

Published : Apr 1, 2023, 6:28 PM IST

Updated : Apr 1, 2023, 7:12 PM IST

Navjot Singh Sidhu released

नवी दिल्ली: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू एक वर्षाची शिक्षा झालेली असताना, सिद्धू यांना त्यांच्या वागणुकीचा विचार करता त्यांना 10 महिन्यांत सोडण्यात आले आहे. त्यांची आज सुटका झाली असल्याने परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे. दरम्यान, माध्यामांशी बोलताना सिद्धू म्हणाले, सध्या देशात लोकशाही नावाची गोष्ट नाही. आता पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट आणण्याचा कट सुरू आहे. तसेच, अल्पसंख्याकांनाही मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जात आहे असा थेट आरोप केला आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पंजाबला कमकुवत करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही कमकुवत व्हाल असही ते म्हणाले आहेत. तसेच, सिध्दू यांनी या देशात जेव्हा जेव्हा हुकूमशाही आली तेव्हा क्रांतीही आली आहे. आणि आता त्या क्रांतीचे नाव राहुल गांधी आहे असे म्हणत आपण काँग्रेसमध्ये आणि राहुल गांधींसोबत आहोत असे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Navjot Singh Sidhu released

सोडण्यास उशीर केला : आज लोकशाही नावाची गोष्ट उरलेली नाही. पंजाबमध्ये अल्पसंख्याक आहेत त्यांना टार्गेट केले जात आहे. तसेच, पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट आणण्याच्या कटाचा एक भाग म्हणूनही त्यांना लक्ष्य केले जात आहे असही ते म्हणाले आहे. परंतु, तुम्ही पंजाबला कमकुवत करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही कमकुवत व्हाल असही ते म्हणाले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, तुरुंग प्रशासनाने मला दुपारी सोडण्यात येईल असे सांगितले होते. पण सोडण्यास उशीर केला अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

  • #WATCH | Patiala: Whenever a dictatorship came to this country a revolution has also come and this time, the name of that revolution is Rahul Gandhi. He will rattle the govt: Navjot Singh Sidhu soon after his release from Patiala jail pic.twitter.com/wkrBrObxDG

    — ANI (@ANI) April 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसकडून स्वागत : ताफ्यासह घरी जातील सिद्धू यांचे वकील एचपीएस वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू काफिलासोबत जेलरोडपासून घरी जातील. यादरम्यान ते गुरुद्वारा श्री दुखनिवरण साहिब आणि काली माता मंदिरात दर्शनासाठी दर्शनासाठी थांबणार असल्याची शक्यता आहे. पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा यांनी सिद्धू यांच्या बाहेर येण्यावर एक ट्विट करून त्यांचे स्वागत केले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांचे स्वागत आहे. आपण सर्व पंजाबी लोकांच्या सेवेत आपले सार्वजनिक जीवन सुरू करू. आपण लवकरच भेटू असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा : राहुल गांधींवरील भिवंडीतील मानहानी दाव्याच्या सुनावणीवेळी २ वर्षाच्या शिक्षेवर जोरदार युक्तिवाद; आता...

Last Updated : Apr 1, 2023, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.