अयोध्या Narendra Modi Ayodhya : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यात मोठा बदल होऊ शकतो. आतापर्यंत मोदी 22 जानेवारीला अयोध्येला पोहोचणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता ते 21 जानेवारीलाच संध्याकाळी रामनगरीत पोहोचण्याची शक्यता आहे.
सुरक्षा यंत्रणा तयारीला : पंतप्रधान नरेंद्र मोदी बडी छावणी संकुलात तुलसीपीठाधीश्वर जगतगुरु रामभद्राचार्य यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवाला उपस्थित राहू शकतात. मोदींच्या आगमन आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी संबंधित सुरक्षा यंत्रणा जोरदार तयारी करत आहे. मात्र 21 जानेवारीला मोदी अयोध्येला कधी पोहोचतील हे अद्याप ठरलेलं नाही.
सरयू घाटावर स्नान करतील : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला सकाळी सर्वप्रथम सरयू घाटावर स्नान करतील. त्यानंतर कलशात पाणी भरल्यानंतर ते पायीच रामजन्मभूमीकडे रवाना होतील. दरम्यान, ते अयोध्येतील छोटी देवकाली मंदिराला भेट देऊ शकतात. यानंतर हनुमानगढी दर्शन आणि नंतर भक्तीपथातून मोदी रामजन्मभूमी संकुलात पोहोचणार असल्याची चर्चा आहे. याबाबत जिल्हा प्रशासनानं अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र तरीही सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी सरयू घाटापासून रामजन्मभूमीपर्यंत कलशातील पाणी पायी घेऊन जाणार असून, त्यासाठी तयारी सुरू आहे.
जगतगुरु रामभद्राचार्य यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती : 21 जानेवारीच्या रात्री पंतप्रधान मोदी अयोध्येत कुठे विश्रांती घेतील याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. जगतगुरु रामभद्राचार्य यांच्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. खुद्द जगतगुरुंनी पंतप्रधानांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आहे. जगतगुरुंच्या 75 व्या जयंतीनिमित्त आयोजित अमृत महोत्सवाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आधीपासूनच होती.
हे वाचलंत का :