ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये भुसुरुंग स्फोटात नागपूरचा जवान हुतात्मा - Nagpur soldier in Chhattisgarh

नक्षलवाद्यांनी घडवून आणल्या भुसुरुंग स्फोटात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसचे जवान मंगेश रामटेके हुतात्मा झाले आहेत. मंगेश हुतात्मा झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण नागपुर जिल्ह्यासह भिवापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Mar 6, 2021, 1:08 PM IST

Updated : Mar 6, 2021, 5:09 PM IST

नागपूर - छत्तीसगड राज्यातील कोहकामेटा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणल्या भुसुरुंग स्फोटात आयटीबीपी म्हणजेच इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसचे जवान मंगेश रामटके यांना वीरमरण आले आहे. मंगेश हे नागपुर जिल्ह्यातील भिवापूर येथील रहिवासी आहेत.

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसचे जवान मंगेश रामटके हुतात्मा

मंगेश हुतात्मा झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण नागपुर जिल्ह्यासह भिवापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आज मंगेश यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मंगेश रामटेके हे 2013 साली वैवाहिक बंधनात अडकले होते. त्यांच्या मागे पत्नी राजश्री आणि सात वर्षीय मुलगा तक्ष सह आई वडील आणि भाऊ असा मोठा परिवार आहे.

आतापर्यंत घटनेत तीन जवान हुतात्मा -

गेल्या दहा दिवसांत नक्षलवादी घटनेत तीन जवान हुतात्मा झाले आहेत. तर दोन जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी रस्ता तयार करण्यास विरोध दर्शविला होता. नक्षलवाद्यांनी कंत्राटदार व त्यांच्या लेखकाला हे बांधकाम थांबविण्याचा इशारा दिला होता.

Last Updated : Mar 6, 2021, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.