नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेमध्ये गुरुवारी गुप्त भुयार आढळून आले आहे. याबाबत दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल म्हणाले, की हे भुयार विधानसभेतून लाल किल्ल्याला जोडले आहे. स्वातंत्र्यसैनिकांना येथून हलविण्यासाठी इंग्रजांकडून या भुयाराचा वापर करण्यात येत होते.
दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल म्हणाले, की 1993 मी आमदार झाल्यानंतर येथे भुयार असल्याची अफवा होती. हा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नव्हती. आम्हाला भुयाराचा शेवट मिळाला आहे. मात्र, आम्ही यापुढे खोदणार नाही. मेट्रो प्रकल्प आणि इतर कामांमुळे भुयाराचे सर्व रस्ते बंद झाले आहेत.
हेही वाचा-सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू हृदयविकाराने नाही -पोस्टमॉर्टम रिपोर्ट; आता केल्या जातील या चाचण्या
येथे फाशीसाठी खोल्या होत्या, याची सर्वांना माहिती होती. मात्र, कधीच त्या उघडल्या नाहीत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी खोलीचे निरीक्षण करण्याचा निश्चय केला. स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली देण्याकरिता या खोलीचे मंदिरात रुपांतरण करण्याची इच्छा आहे.
हेही वाचा-कोविड मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेला उशीर; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
पुढील स्वातंत्र्य दिनापर्यंत पर्यटकांकरिता खोली उघडण्याचा प्रयत्न
1992 मध्ये कोलकातावरून राजधानी दिल्लीला हलविल्यानंतर केंद्रीय विधानसभा म्हणून दिल्ली विधानसभेचा वापर करण्यात आला. दिल्ली विधानसभेला 1926 मध्ये न्यायालयात बदलण्यात आले. या न्यायालयात स्वातंत्र्यसैनिकांची ने-आण करण्यासाठी भुयाराचा वापर करण्यात येत होता. दिल्ली विधानसभेचा देशाच्या स्वातंत्र्याशी जोडलेला इतिहास जाणण्याची लोकांना इच्छा आहे. त्यासाठी पुढील स्वातंत्र्य दिनापर्यंत पर्यटकांकरिता खोली उघडण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी कामदेखील सुरू केले आहे.
हेही वाचा-प्रत्येक गोष्टीला धार्मिक रंग दिल्याने देशाने प्रतिमेवर परिणाम; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी