उडुपी Murder case in Udupi : उडुपीतील नेऊर येथील एकाच कुटुंबातील चार जणांच्या खून प्रकरणातील आरोपींना बेळगाव पोलिसांच्या सहकार्यानं अटक करण्यात उडुपी पोलिसांना यश आलंय. प्रवीण अरुण चौगले (35) असं अटक आरोपीचं नाव आहे. बेळगावच्या कुडूची इथून आरोपीला अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेला आरोपी प्रवीण हा मंगळुरु विमानतळावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.
हत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अटक करण्यात आलेला आरोपी हा महाराष्ट्रातील सांगली येथील असल्याची माहिती आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुडची इथं एका नातेवाईकाच्या घरी थांबला होता. त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याला अटक करण्यात आलीय. ऐनं दिवाळीच्या दिवशी झालेल्या या घटनेनं पुर्ण उडुपी जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या : 12 नोव्हेंबर रोजी घरात आलेल्या गुन्हेगार प्रवीणनं एकाच कुटुंबातील चार जणांवर चाकूनं वार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. आई हसिना (46) आणि मुलं अफनान (23), अयनाज (21) आणि असीम (12) यांचा चाकूच्या वारामुळं मृत्यू झाला. या प्रकरणानं उडुपी जिल्ह्याला धक्का बसला होता. या घराचा मालक परदेशात नोकरीला आहे. घरात एक आई आणि एक वृद्ध स्त्री तीन मुलांसह राहत होती. यावेळी घरात घुसून खून करणारे आरोपी फरार झाले होते.
चार जणांचा खून : खुनाच्या दिवशी तृप्ती नगर, नेजारु, उडुपी येथे एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या झाली असून या संदर्भात सर्व चौकशी केली जाईल, असं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अरुण यांनी म्हटलं होतं. यात चार जणांचा खून झाला आहे. घरमालकाची सासूही जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घरात चोरीचा कोणताही पुरावा नव्हता. तपासानंतर हत्येमागील कारण स्पष्ट होईल, असं पोलीस अधिक्षक अरुण यांनी सांगितलं.
हेही वाचा :