ETV Bharat / bharat

मुंबईतील मेहता जोडप्याचा 300 कोटींच्या रॅकेटमध्ये सहभाग; मध्यप्रदेश पोलिसांकडून लूकआउट नोटीस जारी - मेहता दाम्पत्य अनेक रॅकेटमध्ये सामील

मुंबईतील एका जोडप्याने 300 कोटी रुपयांचे ड्रग्जच्या पैशातून सुमारे 174 कोटी रुपयांचे पैसे ट्रान्सफर करत घरातून पळ काढला आहे. मध्य प्रदेशच्या शिवपुरी पोलिसांनी आता त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे.

आरोपी   मेहता दाम्पत्य
आरोपी मेहता दाम्पत्य
author img

By

Published : Jun 19, 2023, 1:34 PM IST

मुंबई : मध्यप्रदेश पोलिसांनी मुंबईच्या एक जोडप्याला पकडण्यासाठी एक लूक आउट सर्कुलर जारी केली आहे. हे जोडप्यावर 300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. दरम्यान आता हे जोडपे मुंबई आणि मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील खनियाधन पोलिसांच्या रडारमधून गायब झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथील निसार जुबेर खान हा संशयित ड्रग्ज तस्कर आहे. मध्यप्रदेश पोलिसांच्या पथकाने आशिषकुमार एस. मेहता आणि त्याच पत्नी शिवानीला पकडण्यासाठी मध्य पोलिसांचे पथक दोनदा मुंबईत येऊन आले होते. मेहता दाम्पत्य अनेक रॅकेटमध्ये सामील: मेहता दाम्पत्यावर अनेक रॅकेट्स, घोटळ्यात सामील असल्याचा आरोप आहे. यात पॉन्झी स्कीम, डिजिटल चलन आणि मुंबईतील गोरेगाव स्काय-राईजमधील पॉश घरातून ड्रग्सचा सप्लाय करत असायचे. दरम्यान, मध्य प्रदेश पोलीस 11 जून रोजी प्रथम मुंबईत आले होते. त्यांनी मेहता कुटुंबीयांना 13 जून रोजी त्यांच्या पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.

वकिला आरोप : शिवपुरीचे पोलीस अधीक्षक (SP) रघुवंश सिंह भदौरिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, “ते (आशिष मेहता आणि त्यांची पत्नी शिवानी मेहता) कथित ड्रग प्रकरणात संशयित आहेत. एका अंमली पदार्थ प्रकरणातील तक्रारीच्या आधारे चौकशीसाठी त्यांना पकडण्यासाठी शोध सुरू करण्यात आला आहे." परंतु मेहताच्या वकिलांनी सांगितले की, " त्यांच्या पक्षकाराला या प्रकरणात गोवले जात आहे. त्यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. तपशील सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे.

परदेशात गेल्याची शक्यता : मध्य प्रदेश पोलिसांची आठ सदस्यांचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी 16 जून रोजी परत मुंबई दाखल झाले होते.या पथकाने मुंबई पोलिसांचीही मदत मागितली. दरम्यान मुंबई पोलिसात त्यांच्याविरोधात कोणतीच तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. जेणेकरून त्यांचा माग घेतला जाईल. दरम्यान घोटाळा केल्यानंतर हे जोडपं मुंबईतून फरार झाले आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, या जोडप्याने विविध खात्यांमध्ये 174 कोटी रुपयांची मोठी रक्कम हस्तांतरित केली होती आणि एलओसी जारी होण्यापूर्वी ते परदेशात गेले असल्याचा संशय आहे.

खात्यातून सुमारे 174 कोटी रुपये काढले : निसार जुबेर खान याने एमपी पोलिसांना सांगितले होते की "तो मेहता कुटुंबाचा कुरिअर होता. ज्यांचे पार्सल त्याने 6 जून रोजी मध्यप्रदेशात वितरित करण्यासाठी घेतले होते. प्रत्येक डिलिव्हरीपूर्वी त्याला एक नवीन मोबाइल आणि सिम देण्यात आले. हे पार्सल दिल्यावर नष्ट करण्यात करायचे होते. मेहता जेथे राहत होता तेथील लोकांना त्याने खोटं नाव, आणि पत्ता सांगितला होता. परंतु बँकेच्या रिकॉर्डमुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे. त्यांनी आपल्या खात्यामध्ये साधरण 174 कोटी रुपये इतर बँक खात्यात ट्रान्सफर केली आहेत.

हेही वाचा -

  1. Ludhiana Robbery : 10 कोटींच्या दरोड्याची मास्टरमाईंड मोनाला उत्तराखंडमधून अटक
  2. DGP Rajesh Das : महिला आयपीएस अधिकाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी विशेष डीजीपी दोषी, 3 वर्षांची शिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.