ETV Bharat / bharat

MH MP Vinayak Raut in Parliament : खासदार विनायक राऊत यांनी केले कोरोना योद्धांचे कौतूक

author img

By

Published : Dec 2, 2021, 4:49 PM IST

Updated : Dec 2, 2021, 5:41 PM IST

खासदार विनायक राऊत
खासदार विनायक राऊत

17:36 December 02

लसीच्या शंभर कोटी मात्रा, शंभर कोटी जनतेचे पूर्ण लसीकरण कधी..? - खासदार राऊत

खासदार विनायक राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 कोटी लसीचे डोस पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. पण, आज सकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 38 टक्के जणांना लसीच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत. 18 वर्षांखालील लोकसंख्या वगळल्यास अद्याप शंभर कोटी जनतेचे लसीकरण झाले नाही. लसीच्या शंभर कोटी मात्रा झाल्या पण, उर्वरीत शंभर कोटी जनतेचे पूर्ण लसीकरण कधी, असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला. तसेच कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रा घेण्यासाठी पहिल्या व दुसऱ्या मात्रेदरम्यान 84 दिवसांचा कालावधी लागतो तर कोव्हॅक्सिनसाठी 28 दिवसांचा कालावधी. केंद्र सरकार कोव्हॅक्सिनचे उत्पादन का वाढवले नाही, असा सवालही खासदार विनायक राऊत यांनी सदनात उपस्थित केला.

17:23 December 02

महामारीच्या काळात जनतेला लुटणाऱ्या डॉक्टरांविरोधात कायदा करावा - खासदार राऊत

खासदार विनायक राऊत

कोरोना काळात राज्यातील शासकीय रुग्णालयात मोफत इलाज केले जात होते. तसेच आरोग्य योजनेंतर्गत कोविड रुग्णालयातही कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात होते. मात्र, अनेक खासगी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांना लुटण्याचे काम सुरू होते. अनेक रुग्णालयात आरोग्य विमा असल्यास कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात होते. विमा पाच लाखांचा असल्यास सहा ते सात लाख रुपये उपचाराचे बिल होत होते. काही ठिकाणीतर 10 ते 15 लाख रुपये कोरोनाग्रस्तांकडून उपचाराच्या नावाखाली खासगी रुग्णालयांनी वसूल केले आहेत. महामारीच्या काळात अशाप्रकारे रुग्णांना लुटणाऱ्या डॉक्टरांविरोधात देशात कायदा निर्माण करण्याची गरज आहे. जेणेकरून महामारीमध्ये जनता जगेल, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी सदनाक केली.

17:03 December 02

'त्या' ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा - खासदार राऊत

खासदार विनायक राऊत

केंद्राकडून 'पीएम केअर फंडातून' विविध राज्यांसाठी व्हेंटिलेटर देण्यात आले. मात्र, महाराष्ट्रात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी 60 टक्के व्हेंटिलेटर खराब होते. मी केंद्रीय आरोग्य मंत्री किंवा पंतप्रधान मोदी यांना दोषी मानत नाही. पण, ज्या ठेकेदाराने हे व्हेंटिलेटर दिले हा त्यांचा दोष आहे. संबंधित ठेकेदाराकडून तंत्रज्ञ देणे अपेक्षित होते. पण, ठेकेदाराने तंत्रज्ञही पाठवले नाही. यामुळे अशा केंद्र, राज्य व जनतेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली.

16:51 December 02

'धारावी पॅटर्न' हे जगासमोर एक आदर्श बनले - खासदार राऊत

खासदार विनायक राऊत

धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. सर्वांना धारावीतील कोरोनाबाबत चिंता होती. पण, मुंबईतील सर्व आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे, सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, सर्व पक्षीय नेत्यांनी धारावी कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. यामुळे धारावी कोरोनामुक्त झाली व 'धारावी पॅटर्न' हे जगासमोर एक आदर्श बनले, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

16:05 December 02

MH MP Vinayak Raut in Parliament : खासदार विनायक राऊत यांनी केले कोरोना योद्धांचे कौतूक

सदनात बोलताना खासदार विनायक राऊत

लोकसभेत कोरोना विषयावर चर्चा सुरू झाल्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोरोना योद्धांचे कौतूक केले. तसेच त्यांनी कोरोना व्हेरिएंटवर भाष्य केले. तसेच कोविशिल्ड लसच्या दोन डोसमधील अंतर कमी करावी असे ते म्हणाले.

Last Updated : Dec 2, 2021, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.