ETV Bharat / bharat

Raj Thackeray Ayodhya Visit : 'राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही' - भाजपा खासदार ब्रीजभूषण सिंह राज ठाकरे इशारा

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची ( Raj Thackeray Ayodhya Visit ) माफी मागावी, अन्यथा त्यांना मी अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा भाजपाचे खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी ( MP Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray ) दिला आहे.

Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray

author img

By

Published : May 5, 2022, 5:57 PM IST

Updated : May 5, 2022, 6:35 PM IST

मुंबई - राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची ( Raj Thackeray Ayodhya Visit ) माफी मागावी, अन्यथा त्यांना मी अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा भाजपाचे खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी ( MP Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray ) दिला आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( CM Yogi Adityanath ) यांनी राज ठाकरे यांना भेटू नये, अशी विनंतीही त्यांनी केली.

काय म्हणाले ब्रीजभूषण शरण सिंह - आम्ही 2008 पासून बघतो आहे. त्यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीय लोकांवर टीका केली आहे. त्यांनी आपली चूक सुधारावी. तसेच त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा भाजपाचे खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे. तसेच तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांना भेटू नये, अशी विनंतीही त्यांनी केली.

कसा असेल दौरा? - मनसेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आपले कुटुंबीय व त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांसह जूनच्या चार तारखेला उत्तर प्रदेशला रवाना होतील. यावेळी त्यांचे पुत्र मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे व पत्नी शर्मिला ठाकरे या देखील सोबत असतील. राज ठाकरे मुंबईहून लखनऊला जातील. व तिथून ते आयोध्या राम जन्मभूमी येथे दर्शन घेतील. तसेच तेथील काही आखाड्यांना देखील भेट देतील. त्यानंतर या सर्व भेटी झाल्यावर ते पुन्हा आयोध्या ते लखनऊ आणि लखनऊ मधून पुन्हा मुंबई असा प्रवास करतील. असा त्यांचा आयोध्या दौरा असेल.

मुंबईत मनसे पोस्टर - राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील भागात 'चलो अयोध्या' असे पोस्टर मनसेकडून लावण्यात आले होते. या पोस्टरवर 'जय श्रीराम, धर्मांध नाही, मी धर्माभिमानी, असा मजकूरही या पोस्टरवर छापण्यात आला होता.

  • Mumbai | Maharashtra Navnirman Sena puts up 'Chalo Ayodhya' poster in the city appealing to people to join Raj Thackeray in his visit to Ayodhya in the month of June

    Visuals from near Chhatrapati Shivaji Maharaj Terminus pic.twitter.com/G0vmt6UmYk

    — ANI (@ANI) May 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मनसेकडून 12 रेल्वेची मागणी - राज ठाकरे 5 जूनला आयोध्या दौऱ्यावर जाणार असून त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देखील जय्यत तयारी करण्यात येत आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना 12 रेल्वे देण्याची मागणी मनसैनिकांनी केली आहे. तर जवळपास 50 हजाराहून अधिक नागरिक हे आयोध्येला जाणार आहेत. अशी माहिती देखील यावेळी मनसेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - Rana Couple : नवनीत राणांची अखेर सुटका; तपासणीसाठी लीलावती रूग्णालयात दाखल

Last Updated : May 5, 2022, 6:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.