प्रयागराज : संगम शहरातील एका खासगी रुग्णालयात प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा ज्यूस दिल्याच्या ( Mosambi Juice was Injected ) आरोपावरून रुग्णालय सील करण्यात आले. पीडित रुग्णाच्या नातेवाईकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने खासगी रुग्णालयाला सील ठोकले. ( Dengue Patient Died )
२५ हजार रुपयांमध्ये प्लेटलेट्सचे ५ युनिट : मिळालेल्या माहितीनुसार, डेंग्यूचा रुग्ण प्रदीप पांडे प्रयागराजच्या धुमनगंज पोलीस स्टेशन हद्दीतील खासगी रुग्णालयात दाखल होता. त्यांना प्लेटलेट ट्रान्सफ्युजनसाठी कुटुंबातील सदस्यांकडून पाच युनिट प्लेटलेट आणण्यास सांगण्यात आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या मदतीने त्यांना २५ हजार रुपयांमध्ये प्लेटलेट्सचे ५ युनिट मिळाले. यानंतर त्यातच प्लेटलेट्सचे 3 युनिट चढल्यानंतर रुग्णाची प्रकृती बिघडू लागली.
प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा रस दिल्याचा आरोप : त्याची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेले. जिथे बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रदीपच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी धुमणगंजच्या ग्लोबल हॉस्पिटलवर प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा रस दिल्याचा आरोप केला होता. खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासानंतर सीएमओने रुग्णालय प्रशासनाचा प्राथमिक निष्काळजीपणा लक्षात घेऊन सील करण्याचे आदेश जारी केले. काही वेळानंतर गुरुवारी रात्री आरोग्य विभागाचे पथक पोहोचले आणि त्यांनी ग्लोबल हॉस्पिटलला सील केले.