ETV Bharat / bharat

Mohammad Azharuddin : 'कोट्यधीशांच्या' मतदारसंघातील 'सामान्यांचा' विकास करणार, मोहम्मद अझरुद्दीन यांची ETV Bharat शी खास मुलाखत - तेलंगणा विधानसभा निवडणूक

Mohammad Azharuddin : माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी मोहम्मद अझरुद्दीन यांना त्यांच्या मूळ गावी हैदराबादमधून विजयाची खात्री आहे. त्यांच्या मते, येथील बीआरएस सरकार आपली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरलं. ज्युबली हिल्समधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे अझहरुद्दीन विधानसभेत पदार्पण करण्यास उत्सुक आहेत. 'ईटीव्ही भारत'चे निखिल बापट यांनी त्यांची खास मुलाखत घेतली.

Mohammad Azharuddin
Mohammad Azharuddin
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 9:22 PM IST

हैदराबाद Mohammad Azharuddin : टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि कॉंग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन आगामी तेलंगणा निवडणुकीत हैदराबादच्या ज्युबली हिल्स मतदारसंघातून लढत आहेत. त्यांना विजयाची खात्री असून, आपल्याला मतदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

ही निवडणूक वेगळी आहे : "मला विजयाचा पूर्ण विश्वास आहे. खरं तर, माझ्यासाठी हे काही नवीन नाही. मी याआधीही दोन वेळा निवडणूक लढवली आहे. पण मला वाटतं, ही निवडणूक वेगळी असेल. कारण हे माझं गाव आहे. येथील लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. ज्युबली हिल्सच्या जनतेकडून मला जो प्रतिसाद मिळतोय, तो उत्कृष्ट आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांना त्यांची कामं पूर्ण व्हावीत असं वाटतं. मी खूप आनंदी असून मला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे भारावून गेलोय", असं १९९२, १९९६ आणि १९९९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणाऱ्या अझरुद्दीन यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.

तेलंगणात काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल : ६० वर्षीय मोहम्मद अझरुद्दीन हे मध्य हैदराबादमधील युसूफगडा येथे पदयात्रेत सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून खासदार असलेल्या अझरुद्दीन यांना विश्वास आहे की, ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर तेलंगणात काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल. तेलंगणात काँग्रेस सत्तेवर येईल का?, असा प्रश्न विचारला असता अझहर म्हणाले, "हो नक्कीच."

नऊ वर्षांत कोणताही विकास झाला नाही : भारताकडून ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामने खेळलेल्या या माजी भारतीय फलंदाजानं तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि बीआरएसवरही टीका केली. गेल्या नऊ वर्षांत कोणताही विकास झालेला नाही, असं ते म्हणाले. "गेल्या नऊ वर्षांपासून कोणतीही विकास कामं झाली नाहीत. तुम्ही विकास-विकास आणि 'बंगारू' तेलंगणा (गोल्डन तेलंगणा) म्हणत आहात, परंतु प्रत्यक्षात, असं काहीही झालेलं नाही", असं अझरुद्दीन यांनी सांगितलं.

जुबली हिल्समध्ये विकास झालेला नाही : "हा ज्युबली हिल्स मतदारसंघ आहे. याचं नाव खूप मोठं आहे. ज्युबली हिल्स म्हटल्यावर सगळ्यांना वाटतं की इथे अब्जाधीश राहतात. मात्र इथे येऊन बघितल्यावर मला धक्काच बसला. तेव्हाच आमदार होऊन या मतदारसंघाचा विकास करू, असं माझ्या मनात आल्याचं अझरुद्दीन म्हणाले. १५,८५५ प्रथम श्रेणी धावा नावे असलेल्या अझरुद्दीन यांच्या मते, जुबली हिल्समध्ये शून्य विकास झाला आहे.

विकास म्हणजे गरीब लोकांचं उत्थान करणं : "माझ्यासाठी विकास म्हणजे गरीब लोकांचं उत्थान करणं. विकास म्हणजे मोठमोठ्या इमारती बांधणं आणि मोठी माणसं आणणं नव्हे. इथे नोकऱ्या नाहीत. जर तुम्ही इथे राहणाऱ्या लोकांचा विकास केला नाही, तर त्याला विकास म्हणता येणार नाही", असं अझाहुद्दीन म्हणाले. तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी ११९ जागांसाठी मतदान होणार आहे. काँग्रेस ११७ जागांवर निवडणूक लढवत आहे तर त्यांचा मित्र पक्ष सीपीआयनं दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

हेही वाचा :

  1. Telangana Assembly Elections : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पडले, पाहा व्हिडिओ
  2. Telangana Assembly Election : YSRTP ची तेलंगणा विधानसभा निवडणुकीतून माघार, कॉंग्रेसला पाठिंबा
  3. Two Votes For People : 'या' गावांतील लोक करतात दोन राज्यांमध्ये मतदान, वाचा आपल्याच राज्यात कुठे आहेत ही गावं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.