ETV Bharat / bharat

Chandigarh University viral video case विद्यार्थिनींना कॅनडातून फोन, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी - Threatening phone calls from Canada to girls

चंदीगड विद्यापीठातील व्हायरल व्हिडिओच्या प्रकरणात ( Chandigarh University viral video case ) विद्यार्थिनींना विदेशातून धमकीचे फोन येऊ लागले ( Threatening phone calls from Canada to girls ) आहेत. त्यामुळे या मुली आणखी धास्तावल्या आहेत. त्यामुळे काही मुलींनी दावा केला आहे की त्यांना कॅनडातील मॅनिटोबा येथील परदेशी क्रमांक 1 (204) 819-9002 वरून धमकीचे कॉल येत आहेत.

Mohali MMS case
Mohali MMS case
author img

By

Published : Sep 19, 2022, 1:37 PM IST

मोहाली - चंदीगड विद्यापीठातील मुलींचे अंघोळ करातनाचे व्हिडिओ काढल्याचे प्रकरण ( Chandigarh University viral video case ) उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाने आणखी वेगळे वळण घेतल्याचे दिसत आहे. चंदीगड विद्यापीठातील व्हायरल व्हिडिओच्या प्रकरणात विद्यार्थिनींना विदेशातून धमकीचे फोन ( Threatening phone calls from Canada to girls ) येऊ लागले आहेत. त्यामुळे या मुली आणखी धास्तावल्या आहेत. काही मुलींनी दावा केला आहे की, त्यांना कॅनडातील मॅनिटोबा येथील परदेशी क्रमांक 1 (204) 819-9002 वरून धमकीचे कॉल येत आहेत.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी - कॅनडावरून आलेल्या या फोनद्वारे कॉलर मुलींना धमकी देऊन शांत राहण्यास सांगत आहे. आणि असे न केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात आहे. यामुळे या विद्यार्थिनी घाबरल्या आहेत. ज्या मुलींना असे फोन आले आहेत त्या या प्रकरणी पोलिसांकडे अथवा मीडियाकडे माहिती देण्यास धजावत नाहीत.

शनिवारी दुपारी चंदीगड विद्यापीठातील काही विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवल्याचा ( video leak of student Chandigarh University ) आरोप करत विद्यार्थ्यांनी रविवारी दुपारी 1.30 वाजता आंदोलन मागे ( ( protest by girls in chandigarh ) घेतले आहे. डीआयजी, प्रशासनाने विद्यार्थ्यांना निष्पक्ष तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेत असल्याची घोषना केली. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने आठवडाभरासाठी वर्ग स्थगित ( Chandigarh University closed till September 24 ) केले आहेत. विद्यापीठातील आंदोलनानंतर विद्यार्थ्यांचे पालकही मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी पोहोचले आहेत.

19 ते 24 सप्टेंबर पर्यंत वर्ग स्थगित - चंदीगड विद्यापीठ प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. वसतिगृहातील सर्व वॉर्डनच्या बदलीची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यापीठ, पोलिस प्रशासनाने या प्रकरणासाठी विद्यार्थ्यांना समिती स्थापन करण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांव्यतिरिक्त चंदीगड विद्यापीठ व्यवस्थापनाचे अधिकारीही सहभागी होणार आहेत. आंदोलन संपल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक जारी करून 19 ते 24 सप्टेंबर या कालावधीत वर्ग स्थगित करण्याचे जाहीर केले आहे. यादरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

व्हिडिओ व्हायरल - चंदीगड विद्यापीठातील बिघडलेल्या वातावरणामुळे विद्यार्थी आपापल्या घरी परतत आहेत. रविवारी रात्री उशिरा काही पालक मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी पोहोचले होते. विशेष म्हणजे वसतिगृहातील एका मुलीवर इतर मुलींचे काही व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. मात्र, पोलीस, विद्यापीठ प्रशासनाने याचा इन्कार केला आहे. एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे ज्यामध्ये मुलीने असे म्हटले आहे की, तिने बाथरूमचा व्हिडिओ बनवला होता, तसेच तो शिमल्यातील एका मुलाला पाठवला होता.

ऑडिओही व्हायरल - या घटनेचा एक ऑडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये एका वसतिगृहातील विद्यार्थिनीने इतर विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याचे विद्यापीठातील काही विद्यार्थिनींचे म्हणणे ऐकायला मिळते. हे विद्यापीठ चंदीगड-लुधियाना महामार्गावरील घंडुआ शहरात चंदीगडपासून २४ किमी अंतरावर आहे. जुलै २०१२ मध्ये पंजाब विधानसभेत मंजूर झालेल्या खाजगी विद्यापीठ विधेयकाअंतर्गत हे विद्यापीठ अस्तित्वात आले. या प्रकरणी कालच दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.