नवी दिल्ली- देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती पसरवल्याबद्दल सरकारने सोमवारी एक फेसबुक अकाउंट आणि 16 यूट्यूब चॅनेलवर बंदी ( gov banned 16 YouTube channels ) घातली. यातील सहा चॅनल पाकिस्तानातून चालत होते.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ( Ministry of Information and Broadcasting ) एका निवेदनात म्हटले आहे की बंदी घातलेल्या युट्युब चॅनेल ( banned YouTube channels ) आणि फेसबुक खात्यांची एकूण दर्शक संख्या 68 कोटींहून अधिक होती. या चॅनेल आणि फेसबुक खात्यावरून भारतातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडविणे आणि जातीय धार्मिक सलोखा बिघडविण्यासाठी प्रयत्न सुरू ( communal harmony in India ) होते. त्यासाठी खोटी ( False information by youtube channel ) माहिती पसरविली जात होती. अनधिकृत माहिती निर्माण करणे आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू होते.
यापूर्वीही सरकारने केली होती कारवाई- पाकिस्तानमधून चालणारे 4 चार युट्यूब चॅनेल बंद यापैकी एकाही डिजिटल वृत्त प्रकाशकाने माहिती तंत्रज्ञान नियम 2021 च्या नियम 18 अंतर्गत मंत्रालयाला आवश्यक माहिती दिली नाही. याआधी 5 एप्रिल रोजी भारत सरकारने 22 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते. यात पाकिस्तानमधून चालविल्या जाणार्या चार युट्युब चॅनेलचा समावेश होता.
हेही वाचा-minor kabaddi player raped : हरियाणात अल्पवयीन कबड्डीपट्टू मुलीवर धावत्या रेल्वेत बलात्कार