उदयपूर ( राजस्थान ) : कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा करणार ( NIA To Probe Udaypur Murder Case ) आहे. त्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केले आहेत. या दरम्यान, विशेषत: यामागे परदेशातून कुणाचा हात आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. मंगळवारी दोन हल्लेखोरांनी भरदिवसा कन्हैयालाल नावाच्या शिंपीची हत्या केली ( Udaipur Kanhaiyalal Murder Case ) होती. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, हल्लेखोरांचा संबंध दहशतवादी संघटनेशी असल्याच्या बातम्या येत आहेत. दोघेही राजस्थान पोलिसांच्या ताब्यात आहेत.
एनआयएला तपासाची जबाबदारी : बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयएला तपासाची जबाबदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयाने माहिती दिली की यादरम्यान आंतरराष्ट्रीय टेलिग्राम आणि घटनेतील कोणत्याही संघटनेची भूमिका देखील सखोलपणे तपासली जाईल. भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टमुळे दोन्ही आरोपींनी कन्हैयालालची हत्या केली होती.
-
MHA has directed the National Investigation Agency (NIA) to take over the investigation of the brutal murder of Shri Kanhaiya Lal Teli committed at Udaipur, Rajasthan yesterday.
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) June 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The involvement of any organisation and international links will be thoroughly investigated.
">MHA has directed the National Investigation Agency (NIA) to take over the investigation of the brutal murder of Shri Kanhaiya Lal Teli committed at Udaipur, Rajasthan yesterday.
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) June 29, 2022
The involvement of any organisation and international links will be thoroughly investigated.MHA has directed the National Investigation Agency (NIA) to take over the investigation of the brutal murder of Shri Kanhaiya Lal Teli committed at Udaipur, Rajasthan yesterday.
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) June 29, 2022
The involvement of any organisation and international links will be thoroughly investigated.
केंद्रीय गृह मंत्रालयाचे ट्विट : एचएमओने ट्विट करून ही माहिती दिली आहे. इंग्रजीतील पोस्ट वाचते - गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) उदयपूर, राजस्थानमध्ये काल झालेल्या कन्हैया लालच्या निर्घृण हत्येचा तपास हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही संघटनेचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची कसून चौकशी केली जाईल.
हेही वाचा : Udaipur Murder Case : उदयपूर हत्याकांडाचे 'भिलवाडा कनेक्शन' उघड.. प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात