ETV Bharat / bharat

नौदलाचे मिग-29 के अपघातग्रस्त; एका वैमानिकाला वाचविले तर, दुसऱ्याचा  शोध सुरू - प्रशिक्षक मिग-29 के चा अपघात

भारतीय नौदलाचे मिग-29 के हे विमान अरबी समुद्रात अपघातग्रस्त झाल्याची घटना काल, गुरुवारी सांयकाळी घडली. नौदलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

नौदलाचे मिग-29 के
नौदलाचे मिग-29 के
author img

By

Published : Nov 27, 2020, 12:00 PM IST

मुंबई - भारतीय नौदलाचे मिग-29 के हे विमान अरबी समुद्रात अपघातग्रस्त झाले आहे. एका वैमानिकाला वाचविण्यात यश आले आहे. तर दुसरा पायलट बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा अपघात झाला. नौदलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

MiG-29K crashes in Arabian Sea
अपघातग्रस्त भारतीय नौदलाचे मिग-29 के विमान

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग 29- के विमान गोव्यात समुद्र किनाऱ्याजवळ कोसळले होते. विमानात तांत्रिक बिघाड घडल्यामुळे ही दुर्घटना घडली होती. तसेच मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे हवाई दलाचे लढाऊ विमान मिग- 21 कोसळले होते. या अपघातातून दोघेही वैमानिक बचावले होते.

रशियानिर्मित लढाऊ विमान -

मिग-29 के हे रशियानिर्मित लढाऊ विमान आहे. त्यांची लांबी 17.32 मीटर आहे. तर ते 18,000 किलोग्राम वजन घेऊन उड्डाण घेऊ शकते. लडाख सीमेवर चीनसोबत तणावपूर्ण परिस्थिती पाहता, यावर्षी जुलैमध्ये भारताने रशियाकडून मिग-29 के लढाऊ विमान खरेदी करण्याची मंजुरी दिली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.