ETV Bharat / bharat

Naxals killed in Gadchiroli : पोलीस-नक्षलवाद्यांमधील चकमकीची न्यायालयीन चौकशी व्हावी; माओवाद्यांची मागणी - गडचिरोली

ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये(Naxals killed in encounter in Gadchiroli forest) चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवादी(26 Naxals killed) ठार झाले आहेत. या चकमकीची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी पत्रक जारी करत माओवाद्यांनी केली आहे.

Naxals killed in Gadchiroli : पोलीस-नक्षलवाद्यांमधील चकमकीची न्यायालयीन चौकशी व्हावी; माओवाद्यांची मागणी

author img

By

Published : Nov 15, 2021, 11:09 AM IST

Updated : Nov 15, 2021, 11:24 AM IST

हैदराबाद - गडचिरोली चकमकीनंतर माओवाद्यांनी पत्रक जारी केले असून या चकमकीची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. भद्राद्री जिल्ह्यातील भद्राद्री कोठागुडेम आणि पूर्व गोदावरी जिल्हा माओवादी विभाग समितीच्या नावे पत्रक जारी केले आहे. माओवाद्यांनी गडचिरोली चकमकीच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली. ही चकमक पूर्णपणे बनावट असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. सरकारने त्यांना चकमकीच्या नावाखाली मारलं आहे. या चकमकींची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशारा मोओवाद्यांनी दिला आहे.

Maoists demands judicial enquiry on gadchiroli encounter.. released a letter
गडचिरोलीतील चकमकीची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी माओवाद्यांनी पत्रक जारी करत केली आहे.

धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (Naxals killed in encounter in Gadchiroli forest) झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवादी (26 Naxals killed) ठार झाले. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. या चकमकीत नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे(Milind Teltumbde) ठार झाला आहे.

पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले आहे. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.

पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन -

दक्षिण गडचिरोलीमध्ये कोरपर्शीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. हा भाग महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर येतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 जवान काही गावांमध्ये शोध मोहीम राबवत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. घटनास्थळी सी-60 च्या 10 पार्टी होत्या. घटनेनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातून जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले. आतापर्यंत 26 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.

Last Updated : Nov 15, 2021, 11:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.