ETV Bharat / bharat

यंदा संसदेचे मान्सून अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट; १९ दिवस चालणार कामकाज

कोरोना महामारीत संसदेचे हे दुसरे मान्सून अधिवेशन असणार आहे. सामान्यत: संसदेचे मान्सून अधिवेशन हे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. तर स्वातंत्र्यदिनापूर्वी संसदेचे मान्सून अधिवेशन संपते.

Om Birla
ओम बिर्ला
author img

By

Published : Jul 12, 2021, 4:12 PM IST

नवी दिल्ली- यंदाचे संसदेचे पावसाळी (मान्सून) अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार आहे. तर १३ ऑगस्टला संपणार आहे. यामध्ये १९ दिवस कामकाजाचे दिवस असणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.

कोरोना महामारीत संसदेचे हे दुसरे मान्सून अधिवेशन असणार आहे. सामान्यत: संसदेचे मान्सून अधिवेशन हे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. तर स्वातंत्र्यदिनापूर्वी संसदेचे मान्सून अधिवेशन संपते.

हेही वाचा-निसर्गाचा कहर; उत्तरप्रदेशमध्ये विविध ठिकाणी वीज कोसळून तब्बल 41 जणांचा मृत्यू

संसदीय व्यवहार समितीने अधिवेशनाच्या तारखाबाबत शिफारस केली होती. त्यानुसार १९ जुलैला लोकसभेचे मान्सून अधिवेशन सुरू होणार आहे. संसदेच्या अधिवेशनात कोरोनाच्या काळातील सर्व नियमांचे पालन केले जाणार असल्याचे सूत्राने सांगितले. संसदेच्या कॉम्पेक्समध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लशीचा किमान एक तरी डोस घेतलेला असावा, असा विश्वासही सुत्राने व्यक्त केला आहे.

हेही वाचा-नागपुरच्या दामलेंचा 'अमन' निघाला जबलपुरचा 'मोहम्मद आमिर', आधारकार्डमुळे झाली जन्मदात्यांची भेट

गतवर्षी अशी होती मान्सून अधिवेशनात व्यवस्था

राज्यसभेच्या सचिवालयाच्या नियोजनानुसार वरिष्ठ सभागृहातील सदस्य हे दोन्ही सभागृहाचे सदस्य हे चेंबर आणि गॅलरीमध्ये अधिवेशनादरम्यान बसले होते. संसदेच्या इतिहासात १९५२ नंतर प्रथमच अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. चेंबरमध्ये ६० सदस्य बसण्याची व्यवस्था होती. तर राज्यसभेच्या गॅलरीत ५१ सदस्य बसण्याची व्यवस्था होती. तर उर्वरित १३२ सदस्य हे लोकसभेच्या चेंबरमध्ये बसण्याचे नियोजन होते. बैठक व्यवस्थेचे नियोजन हे लोकसभेच्या सचिवालयाकडून करण्यात आले होते. पहिल्यांदाच मोठे स्क्रिन, दोन्ही सभागृहामध्ये विशेष केबल आणि विभागणी करणारे पॉलिकार्बोनेट बसविण्यात आले होते.

हेही वाचा-राजकारणात येण्यापूर्वीच रजनीकांत यांचा "राजकारण संन्यास"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.