ग्वाल्हेर - जिल्ह्यात ब्लॅक फंगसनंतर आता व्हाईट फंगसचे रुग्ण आढळत आहेत. ग्वाल्हेरमध्ये ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन्ही फंगसची एकाच वेळी लागण झालेला एक रुग्ण आढळला आहे. जयारोग्य रुग्णालयात एक 25 वर्षीय तरुण ब्लॅक फंगसची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल झाला होता. डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्याला व्हाईट फंगसचीही लागण असल्याचे समोर आले.
काही दिवसांपूर्वी रुग्णाला कोरोना झाला होता. कोरोनामुक्त झाल्यानंतर, त्याला डोळ्यांत वेदना आणि सूज येणे सुरू झाले होते. जर एखाद्या व्यक्तीला ब्लॅक फंगसची लागण झाली असेल तर त्याला व्हाईट फंगसचीही लागण होऊ शकते. ब्लॅक आणि व्हाईट फंगसची लक्षणे समान आहेत.
ब्लॅक फंगसची रुग्ण संख्या वाढतेयं -
सुरुवातीच्या लक्षणे म्हणजे डोळ्यांना सूज येणे, सुन्न होणे, डोळे लाल झाले. जर हे लक्षण मेंदूपर्यंत पोहोचले तर डोकेदुखीसह रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो. लहान मुलांमध्ये ब्लॅक फंगसच्या संसर्गाची गुजरातमध्ये घडली. ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या 80 च्या वर पोहोचली आहे आणि ही संख्या निरंतर वाढत आहे. यापैकी 35 रुग्णांचे ऑपरेशन झाले आहे. डॉ नॉर्वेच्या मते मधुमेह, कर्करोग, मूत्रपिंडातील रुग्ण आणि अवयव प्रत्यारोपणाच्या रुग्णांना व्हाईट फंगसची लागण होण्याची शक्यता जास्त आहे.
ब्लॅक आणि व्हाईट फंगसची लक्षणे समान -
म्युकरमायकोसिस (फंगस)हा एक जंतूसंसर्ग आहे. हा बुरशीजन्य आजार आहे. हा आजार जुना असून आता मधुमेह असलेल्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये हा आजार आता बळावत आहे. कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशात नाक आणि सायनसमध्ये जंतूसंसर्ग वाढतो. नाक आणि सायनसची त्वचा खराब होऊन संसर्ग आणखी वाढतो. मग सायनसपासून तो डोळ्यांकडे पुढे मेंदूकडे जातो. यादरम्यान नाकात दुखणे, डोकेदुखी, डोळे दुखणे आणि डोळे लाल होणे अशी लक्षणे सुरू होतात. ही लक्षणे असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे धाव घेत उपचार घेणे आवश्यक असल्याचे डॉ. केवळे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - देशात गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ४० हजार नव्या रुग्णांची नोंद; ३,७४१ बळी