कोलकाता - राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यात भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या युतीला समर्थन द्यावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव अमरजीत अमित यांनी केले.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षांत आणि विशेषत: डाव्या राजवटीत जातीय दंगल घडली नव्हती. महिलांना सुरक्षित वाटत असे. पण आता परिस्थिती बदलली आहे. केंद्र सरकारने कामगार व शेतकर्यांविरूद्ध कायदे केले आहेत, असे त्या म्हणाल्या.
भाजपाच्या राजवटीत राज्यात कोणताही विकास झालेला नाही. खाजगीकरण ही मोठी चिंताजनक बाब आहे. सरकार तेल आणि वायू कंपन्यांच्या खासगीकरणाकडे वाटचाल करत आहेत. माजी सरकारने बीपीसीएलचे खासगीकरण करण्यासाठी पावले उचलली होती, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेस-डाव्यांनी तृणमूलचा प्रस्ताव फेटाळला होता -
भाजपसारख्या धर्मांध व फुटीरतावादी पक्षाच्या मुकाबला करण्यासाठी काँग्रेस व डाव्या पक्षांनी आमची साथ द्यावी असे आवाहन तृणमूल काँग्रेसने बुधवारी केले होते. पण तृणमूलचे हे आवाहन दोन्ही पक्षांनी साफ फेटाळले. तर काँग्रेसने तृणमूल काँग्रेसला आमच्यातच विलिन व्हावे असे उत्तर दिले होते. दरम्यान, 2016 च्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस-डाव्यांच्या युतीला 294 जागांमधील 76 जागा तर तृणमूलला 211 जागा मिळाल्या होत्या.