ETV Bharat / bharat

Making reel on bike चालत्या बाईकवर मोबाईल शुटींग करणे पडले महागात, अपघातात तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी - Youth dies in accident

निष्काळजीपणामुळे अनेकांना अपघात होऊन जीव गमवावा लागतो. अशीच एक घटना पानिपतमध्ये घडली असून बाईक चालवत असताना मोबाईलवर व्हिडिओ शुटींग करणे तरुण-तरुणींला महागात ( Making reel on bike in Panipat ) पडले. पानिपतच्या रस्त्यावर त्यांचा अपघात झाला अन् त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ( Youth dies in accident )

died in accident
died in accident
author img

By

Published : Sep 25, 2022, 10:13 PM IST

पानिपत : निष्काळजीपणामुळे अनेकांना अपघात होऊन जीव गमवावा लागतो. अशीच एक घटना पानिपतमध्ये घडली असून बाईक चालवत असताना मोबाईलवर व्हिडिओ शुटींग करणे तरुण-तरुणींला महागात ( Making reel on bike in Panipat ) पडले. पानिपतच्या रस्त्यावर त्यांचा अपघात झाला अन् त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ( Youth dies in accident)

हरियाणातील पानिपतमध्ये ताऊ देवीलाल चौकाजवळ घडला. ज्यामध्ये १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला ( Youth dies in accident). या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेली मुलगी गंभीर जखमी झाली. दुचाकीसमोरून एक कार जात असल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक कार चालकाने ब्रेक लावला आणि मागून येणारी दुचाकी त्यात आदळली. अपघातानंतर लगेचच आजूबाजूच्या लोकांनी अॅम्ब्युलन्स बोलावून दोघांनाही रुग्णालयात नेले.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुज शर्मा असे मृताचे नाव असून तो शास्त्री कॉलनी पानिपत येथील रहिवासी आहे. अनुज त्याची मैत्रिण खुशीसोबत बाईकवरून जात होता. त्याच्या समोरून अर्टिगा कार जात होती त्यात दुचाकीला धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, अनुजचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पाठीमागे बसलेली अनुजची मैत्रिण खुशी ही गंभीर जखमी झाली आहे. अपघात झालेल्या कारच्या चालकाने दोघांनाही कारमध्ये बसवून पानिपत येथील सामान्य रुग्णालयात नेले.

डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले आणि प्राथमिक उपचारानंतर मुलीला पीजीआय रोहतक येथे रेफर करण्यात आले. समोरून येणाऱ्या कारच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत लिहिले आहे. त्याचवेळी दुचाकीवरून चालताना मोबाईलवर व्हिडिओ शुटींग करीत असल्याचेअसल्याचे जखमी तरुणीचेच म्हणणे आहे. मोबाईलमध्ये लक्ष गेल्याने हा अपघात झाला. सध्या पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पानिपतच्या सामान्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.