प्रयागराज (उत्तरप्रदेश) - अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. अंत्ययात्रेत अनेक महंत, साधू प्रयागराजमध्ये पोहोचत आहे. माजी खासदार राम विलास वेदांती देखील श्री मठ बाघंबरीमध्ये दाखल झाले आहे. समाधी देण्याच्या अगोदर महंत गिरी यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याची व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आली. शवविच्छेदन अहवालानुसार, महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाली आहे. माहितीनुसार त्यांच्या गाळ्याला गळफासाचे निशाण आणि व्ही आकार प्राप्त झाला आहे.
गंगास्नानानंतर महंत नरेंद्र गिरी यांच्या अंत्ययात्रा काढण्यात येईल. यानंतर त्यांना समाधी दिली जाईल. महंत नरेंद्र गिरिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आज आनंद गिरी आणि आद्या प्रसाद तिवारी न्यायालयात हजर राहतील. पोलीस चौकशीनंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेनंतर आनंद गिरी आणि आद्या प्रसाद तिवारी यांना न्यायालयात आणले जाईल.
अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सक्तीच्या आदेशानंतर डीआयजी सर्वश्रेष्ठ त्रिपाठी यांनी एसआयटीची स्थापन केली आहे. 18 सदस्यांच्या या समितीत डीएसपी अजित संह चौहान आणि आस्था जैसवाल यांचा समावेश आहे. यासोबतच चार पोलीस निरीक्षकांसोबत तीन उपनिरीक्षकांचा ही समावेश आहे. याव्यतिरिक्त यात 9 पोलीस शिपाईदेखील सहभागी आहेत. या एसआयटीमध्ये गुन्हे शाखेच्या सोबतच नार्कोटिक्सचे प्रभारी आणि फिल्ड युनिटचे तज्ञ यांचाही समावेश आहे.
हेही वाचा - महंत गिरी यांच्या मृत्यूने अध्यात्मिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान- योगी आदित्यनाथ
आनंद गिरीविरोधात गुन्हा दाखल -
महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूनंतर पोलिसांनी याप्रकरणात त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी सायंकाळी सुसाइड नोट समोर आली. यानंतर या प्रकरणात आरोपींची संख्या वाढू शकते. यासोबतच ब्लॅकमेल करणे आणि धमकावणे सारखी कलमेही लावली जाऊ शकतात. जॉर्ज टाऊन पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य अमर गिरी पवन महाराज यांच्या दिलेल्या तक्रारीवरुन 21 सप्टेंबरला याप्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली. यात स्वामी आनंद गिरीवर कलम 306अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणात आरोपींविरोधात आणखी काही कलमे वाढवली जाऊ शकतात. पोलिसांनी आतापर्यंत आनंद गिरीसोबतच मोठ्या हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी आद्या तिवारीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी-अखिलेश यादव