उज्जैन मध्यप्रदेश उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या दोन पुजाऱ्यांनी शनिवारी ऑनलाइन फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोने बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची जाहिरात करणारी जाहिरात मागे घेण्याची मागणी केली. कारण ती जाहिरात हिंदूंच्या भावना दुखावणारी आहे. जाहिरातीत ऋत्विक रोशन म्हणतो की, त्याला उज्जैनमध्ये भोजन करावेसे खावेसे वाटले म्हणून त्याने महाकाल वरून थाळी ऑर्डर केली Zomato ad featuring Hrithik . मात्र, यालाच मंदिर पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. zomato to withdraw offensive ad featuring hrithik महाकाल मंदिराच्या थाळीची झोमॅटोकडून थट्टा करण्यात आली असाही त्यांचा आरोप आहे.
उज्जैनमधील शिवाचे महाकालेश्वर किंवा महाकाल मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे जे देशभरातील भक्तांना आकर्षित करते. मंदिराचे पुजारी महेश आणि आशिष म्हणाले की, झोमॅटोने त्वरित जाहिरात मागे घ्यावी आणि माफी मागावी. भाविकांना थाळीवर प्रसाद दिला जातो आणि या जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहे, असा दावा त्यांनी केला. येते प्रसाद मोफत दिला जातो आणि झोमॅटोच्या जाहिरातीमुळे चुकीचा संदेश हिंदू भाविकांमध्ये जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
पुजाऱ्यांनी महाकाल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असलेल्या उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांच्याशीही संपर्क साधला आणि कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली. जेणेकरून कोणीही पुन्हा हिंदू धर्माची थट्टा करू नये, असे पुजाऱ्यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना सिंग यांनी या जाहिरातीला "भ्रामक" म्हणून संबोधले. या जाहिरातीमुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. ते म्हणाले की, मंदिर प्रसाद म्हणून मोफत जेवण देते आणि प्रसादाची विक्री केली जात नाही.
हेही वाचा - श्रावणी सोमवारानिमित्त मध्यप्रदेशातील उज्जैन महाकाल मंदिरात भक्तांची मांदियाळी