श्रीनगर ( जम्मू काश्मीर ) - दहशतवादांविरोधात कारवाई करणाऱ्या जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरुवारी मोठे यश मिळाले आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील मालवाह भागात सुरू असलेल्या ( gunfight at Malwah area ) चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) दोन दहशतवाद्यांना ( two Lashkar e Toiba militants ) ठार केले आहे.
काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार ( IGP Kashmir Vijay Kumar ) म्हणाले, की एलईटीचा आघाडीचा दहशतवादी मुहम्मद युसूफ कांतरू ( LeT militant Muhammad Yousuf Kantroo ) आणि त्याच्या साथीदाराला ठार करण्यात आले. कांतरू हा आतापर्यंत सर्वात जास्त काळ जिवंत राहिलेला दहशतवादी होता. अनेक हत्यांमध्ये त्याचा सहभाग होता. तो गेल्या 22 वर्षांपासून सक्रिय होता. सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश आहे.
निष्पाप नागरिकांनाही दहशतवाद्याने केले होते ठार- कांतरू हा दहशतवादी बराच काळ सुरक्षा दलाच्या हिटलिस्टवर होता. बडगाम जिल्ह्यात नुकतेच एसपीओ, त्याचा भाऊ, एक सैनिक आणि एका नागरिकाच्या हत्येसह नागरिक आणि सुरक्षा दलाच्या कर्मचार्यांच्या अनेक हत्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याने बीडीसी चेअरमन सरदार भुपिंदर सिंग यांची 23 सप्टेंबर 2020 रोजी हत्या केली होती. सुरक्षा दलाच्या माहितीनुसार सुरक्षा दलाची कोणतीही हानी न होता कारवाई सुरू आहे. दहशतवादी णि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारात किमान तीन सैनिक आणि एक पोलिस जखमी झाले आहेत.
आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता - दहशतवाद्यांबरोबरील चकमकीत जखमी झालेल्या जवांनाना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांबरोबर अजूनही चकमक सुरू आहे. त्या भागात आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे.
दहशतवाद्यांबरोबरील चकमक सुरू- बडगाम पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस, सैन्यदल आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने जिल्ह्यातील मालवाह भागात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केल्यानंतर काही वेळातच चकमक सुरू झाली.
हेही वाचा-Terrorist Killed In Pulwama : पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार
हेही वाचा-जम्मू-काश्मीर पोलिसांकडून लष्कर-ए-तैयबा (एलईटी)च्या तीन अतिरेक्यांना अटक
हेही वाचा-Mushtaq Ahmed Zargar : अल-उमर मुजाहिदीनचा म्होरक्या अहमद जरगर दहशतवादी म्हणून घोषीत