मुंबई - नोबल पुरस्कार हा जगातील सर्वात ( Nobel Prize winners in India ) मानाचा पुरस्कार आहे. विज्ञान, साहित्य, अर्थ या सारख्या अनेक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार ( list of nobel prize winners in india ) जाहीर होतो. या पुरस्काराची स्थापना 1895 मध्ये ( nobel prize winners ) करण्यात आली होती. डायनामाईट नावाच्या स्फोटकाचा शोध लावणारे अल्फ्रेड नोबेल यांचा 1896 मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या ( alfred nobel prize winners ) आठवणीत हा पुरस्कार विशिष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ( Nobel Prize India people ) दिला जातो. कुठल्याही क्षेत्रात मागे नसलेल्या भारतीयांना देखील हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. ही देशासाठी गौरवाची बाब आहे. देशाची मान संपूर्ण जगात उच करणाऱ्या नोबेल पुरस्कार विजेते भारतीयांबाबत आज आपण जाणून घेऊया.
हेही वाचा - नोबेल 2021 : साहित्यातील नोबेल अब्दुलरझाक गुर्नाह यांना जाहीर
- रवींद्रनाथ टागोर - प्रसिद्ध भारतीय कवी, संगीतकार आणि चित्रकार, रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या अत्यंत संवेदनशील, ताजे आणि सुंदर श्लोकांसाठी साहित्यातील नोबेल पारितोषिक 1913 साली देण्यात आले. द बार्ड ऑफ बंगाल आणि गुरुदेव अशी टागोर यांची ओळख आहे. टागोर भारतातील महान साहित्यिकांपैकी एक होते. त्यांनी भारत आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत रचले आणि श्रीलंकेचे राष्ट्रगीत त्यांच्या कवितेतून प्रेरित असल्याचे मानले जाते. टागोरांची गाणी, कविता, कादंबर्या आणि निबंध आता कल्ट क्लासिक बनले आहेत.
- सी.व्ही रमन - सर चंद्रशेखर वेंकट रमण किंवा सी.व्ही रमण यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. प्रकाशाच्या विखुरण्यावर आणि रमण इफेक्ट या त्यांच्या शोधासाठी त्यांना नोबल पारितोषिक मिळाला होता. दिशा बदललेल्या प्रकाश किरणांतील लहरींमध्ये बदल झाल्याच्या घटनेला रमन इफेक्ट म्हटल्या जाते. भौतिकशास्त्रात हा शोध एक मैलाचा दगड आहे. रमण हे भारतातील महान नोबेल पारितोषिक विजेत्यांपैकी एक होते.
- हर गोबिंद खोराना - भारतीय वंशाचे अमेरिकन बायोकेमिस्ट हर गोबिंद खोराना यांना 1968 मध्ये मार्शल डब्ल्यू. निरेनबर्ग आणि रॉबर्ट डब्ल्यू. हॉली यांच्यासोबत नोबर पुरस्कार मिळाला होता. जेनेटिक कोडचा उलगडा करणे आणि त्याचा प्रोटीन सिन्थेसिस मधील त्याचे कार्य, या संशोधनासाठी त्यांना औषधशास्त्रात हा पुरस्कार मिळाला होता. न्युक्लिक अॅसिडमधील ( पेशींच्या जेनेटिक कोडचा वाहक ) न्युक्लिओटाइड्स हे सेलद्वारे होणाऱ्या प्रोटीन सिन्थेसिसच्या क्रियेला नियंत्रित करतात, हे या तिन्ही शास्त्रज्ञांनी दाखवून दिले होते.
- मदर टेरेसा - मॅसेडोनिया प्रजासत्ताकात जन्मलेल्या मदर टेरेसा वयाच्या 19 व्या वर्षी भारतात आल्या. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य येथे रोमन कॅथोलिक नन म्हणून आणि मिशनरी म्हणून गरिबातील गरीब लोकांची सेवा करण्यात घालवले. मानवतावादी कार्य करत त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली.
गरिबांची मसिहा म्हणून मदर टेरेसा यांची ओळख आहे. जगाच्या सर्व भागातून त्यांनी मदत आणली. 1979 मध्ये मदर टेरेसा यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले. - सुब्रह्मण्यन चंद्रशेखर - सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांना 1983 साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाला. तार्यांची रचना आणि उत्क्रांतीला महत्व देण्याच्या भौतिक प्रक्रियेच्या सैद्धांतिक अभ्यासासाठी (studies of physical processes of importance to the structure and evolution of the stars) त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. नोबेल पारितोषिक विजेते सर सीव्ही रमण यांचे ते पुतणे आहेत. सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांचा जन्म भारतात झाला पण ते अमेरिकेत गेले. त्यांच्या शोधांमुळे ताऱ्यांच्या उत्क्रांतीत सामील असलेल्या भौतिक प्रक्रियेची स्थापना झाली. त्यांनी व्हाईट ड्वार्फच्या वस्तुमानाची वरची मर्यादा देखील निश्चित केली, यास चंद्रशेखर लिमिट असे संबोधले जाते.
- अमर्त्य सेन - 1998 मध्ये अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रामध्ये नोबल पुरस्कार मिळाला. वेलफेअर इकोनॉमिक्समधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. माणिकगंज (ब्रिटिश भारत) येथे जन्मलेले सेन यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि अमेरिका आणि युनायटेड किंग्डम या दोन्ही देशांतील अनेक नामांकित संस्थांमध्ये त्यांनी हा विषय शिकवला. महान भारतीय नोबेल पारितोषिक विजेत्यांपैकी एक, अर्थशास्त्र आणि सामाजिक न्याय, दुष्काळाचे सिद्धांत आणि कल्याणकारी अर्थशास्त्र यावरील त्यांच्या शोधनिबंधांमुळे त्यांना 1998 मध्ये नोबेल मेमोरियल पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले.
- व्यंकटरमण रामकृष्णन - भारतीय वंशाचे अमेरिकन-ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ व्यंकटरमण रामकृष्णन यांना थॉमस ए. स्टीट्झ आणि अडा ई. योनाथ यांच्यासमवेत रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2009 मध्ये मिळाला होता. रायबोसोमची रचना आणि त्याच्या कार्याच्या अभ्यासासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यंकटरमण हे सध्या रॉयल सोसायटीचे (लंडनचे) अध्यक्षही राहिले आहेत.
- व्ही.एस. नायपॉल - व्ही एस नायपॉल हे त्रिनिदादला स्थलांतरित झालेल्या हिंदू भारतीयांचे पुत्र होते. 30 हून अधिक पुस्तक लिहिलेल्या नायपॉल यांना 2001 मध्ये साहित्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. कामातील ग्रहणक्षम कथाकथन ( united perceptive narrative ) आणि प्रामाणिक छाननी ( incorruptible scrutiny in works ) जी आपल्याला दडपलेला इतिहास पाहण्यास भाग पाडते, यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
- कैलाश सत्यार्थी - मध्य प्रदेशातील कैलाश सत्यार्थी यांना 2014 मध्ये मुले आणि तरुणांवरील दडपशाहीविरुद्ध आणि सर्व मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी संघर्ष केल्याबद्दल नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सत्यार्थी यांनी चाईल्ड लेबरविरुद्ध आवाज उठवला होता.
- अभिजीत बॅनर्जी - भारतीय - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९६१ रोजी धुळे (भारत) येथे झाला. जागतिक गरिबी कमी करण्यासाठी केलेल्या प्रायोगिक कार्यासाठी बॅनर्जी यांना त्यांची पत्नी एस्थर डफ्लो आणि हार्वर्ड विद्यापीठाचे मिशेल क्रेमर यांच्यासमवेत अर्थशास्त्रातील नोबेल मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हेही वाचा - नोबेल 2021 : माध्यम स्वातंत्र्य जपणाऱ्या पत्रकार द्वयीला यंदाचा शांततेचा नोबेल