ETV Bharat / bharat

Link Aadhaar With PAN Card : पॅनकार्डधारकांना आयकर विभागाने दिला सतर्कतेचा इशारा, जाणुन घ्या काय आहे प्रकरण

तुम्ही जर का आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक केलं नसेल, तर ही तुमच्याकडे शेवटची संधी आहे. यावेळी लिंक न केल्यास तुम्हाला तुमचे पॅनकार्ड कचऱ्याच्या डब्यात फेकावे लागेल.

Link Aadhaar And PAN Card
पॅनला करा आधार लिंक
author img

By

Published : Jan 16, 2023, 5:06 PM IST

तुमच्याकडे पॅनकार्ड आहे का? मग आयकर विभागाने दिलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष करू नका. याचं कारण म्हणजे तुम्ही दुर्लक्ष केलं, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. पॅनकार्ड हा आर्थिक व्यवहारातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. बँकेत आयकर भरताना पॅनकार्ड आवश्यक आहे. त्यामुळे पॅनकार्ड होल्डर्ससाठी ही महत्त्वाची बातमी.

आयकर विभागाची सुचना : तुम्ही अजूनही तुमचं पॅनकार्ड जर आधारशी लिंक केलं नसेल, तर तातडीने ते करा. आयकर विभागाने याबाबत सुचना दिली आहे. 1 एप्रिल 2023 आधी तुम्ही आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. आयकर विभाग वारंवार आपल्या वेबसाईट तसेच सर्व सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आठवण करून देत आहे

31 मार्च 2023 पर्यंत करा लिंक : जर तुम्ही अजूनही पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केलं नसेल, तर तुमच्याकडे 31 मार्च 2023 पर्यंतची मुदत आहे. जर तुम्ही ते यानंतरही लिंक केलं नाही तर, 31 मार्चनंतर म्हणजेच 1 एप्रिलपासून तुमचं पॅनकार्ड बंद होणार आहे. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही तुमचं आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक केलं असेल, तर तुम्हाला 1000 रुपये शुल्क द्यावं लागेल. एवढंच नाही तर, जर तुम्ही 31 मार्च 2023 पर्यंत तुमचं आधार आणि पॅन लिंक केलं नाही, तर तुमचं पॅनकार्ड निष्क्रिय होईल.

भरावे लागणार 1000 रु शुल्क : पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. 31 मार्च 2022 नंतर आणि 30 जून 2022 पूर्वी पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं होतं. एवढेच नव्हे तर 30 जून 2022 नंतर पॅन आणि आधार लिंक करण्याचे शुल्क 500 रुपयांवरून 1000 रुपये करण्यात आले आहे.

घरबसल्या करा लिंक : पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस घर बसल्या देखील पूर्ण होऊ शकते. ती कशी करावी याची संपूर्ण माहिती यू-ट्यूब वर मिळू शकते. आणि ही प्रक्रिया पाच ते दहा मिनिटांमध्ये पूर्ण होणारी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.