नवी दिल्ली : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने आता त्याला सात दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. बिश्नोई सध्या पंजाबमधील भटिंडा तुरुंगात कैद आहे. गेल्या वर्षी दाखल झालेल्या एका प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बिश्नोईला आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर केले.
बिश्नोईविरोधात आणखी एक गुन्हा नोंदवला : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यासाठी एनआयएने कोर्टाकडे सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. यानंतर पटियाला हाऊस न्यायालयाचे मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शैलेंद्र शर्मा यांनी हे प्रकरण विशेष एनआयए न्यायालयात वर्ग केले. यासोबतच बिश्नोई याच्या सुरक्षेचीही काळजी घेण्याचे निर्देश कोर्टाने एजन्सीला दिले आहेत. यासोबतच एजन्सीने बिश्नोईविरोधात आणखी एक नवीन गुन्हाही नोंदवला आहे.
या प्रकरणात करण्यात आले हजर : गेल्या वर्षी एनआयएने अर्शदीप हत्याकांडात लॉरेन्स बिश्नोई विरुद्ध गुन्हेगारी क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. एनआयनेच्या टीमने यापूर्वी 24 नोव्हेंबर 2022 रोजी लॉरेन्स बिश्नोईला चौकशीसाठी दिल्लीला नेले होते. या प्रकरणी चौकशीसाठी एनआयएने बिश्नोईला पंजाबमधील भटिंडा तुरुंगातून प्रोडक्शन वॉरंटवर आणले आहे. बिश्नोईला दिल्लीत सोडण्यासाठी एनआयएसोबत पंजाब पोलिसांचे एक पथकही आले आहे.
मुसेवाला हत्याकांडाची जबाबदारी घेतली आहे : एनआयएच्या कोठडीच्या मागणीवरून पतियाळा हाऊस कोर्टातील न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांच्या एनआयए कोर्टात आज दुपारी एक वाजता या प्रकरणाची सुनावणी झाली. विशेष म्हणजे लॉरेन्स बिश्नोईवर दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि चंदीगडसह अनेक राज्यांमध्ये 36 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. लॉरेन्स ग्रुप आणि गोल्डी ब्रार यांनी मुसेवाला हत्याकांडाची जबाबदारी घेतल्यानंतर विविध पोलीस ठाण्याचे पोलीस सातत्याने लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करत आहेत. कॅनडात असलेला गोल्डी ब्रार अजूनही पोलिसांपासून फरार आहे.
हे ही वाचा : Haryana Building Collapsed: हरियाणामध्ये तीन मजली इमारत कोसळली, ३० मजूर अडकले, चार ठार, २० जखमी, बचावकार्य सुरू