ETV Bharat / bharat

Marathwada Mukti Sangram Day मराठवाडा मुक्ती संग्राम दिन; काय आहे या दिनाचा इतिहास, जाणून घेऊया - 17 September 1948

१९४७ च्या काळात मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्याा जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी, हैद्राबादच्या निजामाविरोधात दिर्घ लढा द्यावा लागला, तसेच अनेकांना या लढ्यात त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले. शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा भारताचा एक भाग बनला. तेव्हापासुन 'मराठवाडा मुक्ती दिन' (Marathwada Mukti Sangram Day) साजरा केला जातो.history of this day

Marathwada Mukti Sangram Day
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
author img

By

Published : Sep 13, 2022, 7:49 PM IST

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैद्राबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. त्या काळात मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्याा जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी, हैद्राबादच्या निजामाविरोधात दिर्घ लढा द्यावा लागला, तसेच अनेकांना या लढ्यात त्यांच्या जीवाचे बलिदान (Marathwada Mukti Sangram Day) द्यावे लागले.history of this day

निजाम मीर उस्मान अली खानचे राज्य : हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान याचे राज्य होते. हैद्राबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते. निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी; स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला होता.

जनतेवर झाले अनन्वित अत्याचार : १९३८ ते १९४८ हा मराठवाडा मुक्तीसंग्रामचा प्रमुख कालखंड म्हणुन ओळखला जातो. हैद्राबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरू झाल्यावर, निजामाचा सेनापती कासीम रझवी याने मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (लघुरूप एम आय एम) या संघटनेच्या माध्यमातून रझाकार नावाने मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली आणि त्यांच्या मदतीने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरू केले होते.

अनेकांनी दिले योगदान : मुक्ती संग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते. मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वेर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला.

अनेकांना आले वीर मरण : या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत, गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचे मोल काढणे शक्य नाही. यासीन जूबेर हैद्राबादी मंत्री याने मुक्तीसेनेने ताब्यात घेतलेली जमीन परत घेण्याची प्रतिज्ञा केली. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर तालूक्यातील जातेगाव माळावर निजामाच्या सैन्याला पुढे सरकु दिले नाही. यामध्ये मानसिंग राजपुत, लक्ष्मण आवचार, रामलाल राजपूत, व रामचंद्र धंदेवार हे आघाडीवर होते. यामध्ये रामचंद्र धंदेवार हे बाळगिर मठ सरला येथे, बंदुकीच्या गोळीने वेध घेतल्याने शहीद झाले. त्यावेळी गोदामाय दुथडी भरून वाहत होती. रामचंद्र यांना सिरसागर नावाच्या मर्दाने आपल्या पाठीवरून पैलतीरी आणुन भर पावसात खड्डा केला व त्यांचा विधी पूर्ण केला होता.

गांधीजांनी दिली शस्त्र संमती : निझाम सरकारचे हे अत्याचार एवढे अनन्वित होते की, हैद्राबाद मुक्तिसंग्रातील काँग्रेस कार्यकर्यांच्या हाती शस्त्रे घेऊ देण्याच्या विनंतीस स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा संमती दिली. शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझाम सरकारच्या विरोधात पोलीस ऍक्शनची घोषणा केली.

मराठवाडा बनला भारताचा भाग : १३ सप्टेंबरला ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे एन चौधरीच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निझाम संस्थानावर कारवाई सुरू झाली. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरू झाल्यावर २ तासांत नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल पोलीसांनी ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. औरंगाबाद सर करून फौजा पुढे निघाल्या. भारतीय फौजे पुढे रझाकार फार वेळ टिकू शकले नाहीत. निजामी सैन्य माघार घ्यायला लागले आणि कासीम राजवीला अटक झाली. शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी शरणांगती स्वीकारली आणि निझाम सरकारने हार मानली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा भारताचा एक भाग बनला. तेव्हापासुन १७ सप्टेंबर १९४८ ला 'मराठवाडा मुक्ती दिन' साजरा केला जातो.

मराठवाड्यातील जनतेने मोठे योगदान : हैद्राबाद विधानसभेत मराठवाड्यातील आमदारांनी केंद्र शासनास हैदराबादचे विभाजन करण्यास भाग पाडले. तसेच मराठवाडा सहित स्वतंत्र तेलंगणा व स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचाही डाव उधळुन लावला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात मराठवाडा भाषिक आधारे महाराष्ट्रात सामील करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी देखील मराठवाड्यातील जनतेने मोठे योगदान दिले. त्यानंतर १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.Marathwada Mukti Sangram Day

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.