हैदराबाद - सुपर मून, ब्लड मून आणि पूर्ण चंद्र ग्रह त्यानंतर आकाशात सूर्यग्रहण दिसणार आहे. गुरुवारी 10 जून 2021ला सूर्यग्रहण आहे. या दिवशी ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष अमावस्या आहे. दुपारी 01.42 वाजल्यापासून सायंकाळी 06.41 पर्यंत ग्रहणाचा कालावधी आहे.
सूर्यग्रहणादम्यान मंदिरेही चालू
भारतात हे सूर्यग्रहण थोड्या प्रमाणातच पाहता येणार आहे. त्यामुळे ग्रहणाच्या वेळी पाळण्यात येणारे सूतक नियम भारतासाठी लागू होणार नाहीत. परिणामी भारतात सूर्यग्रहणादम्यान मंदिरेही चालू राहणार आहेत. मात्र, अरुणाचल प्रदेश, उत्तर अमेरिका, कॅनडा, रुस या देशांमध्ये हे सूर्यग्रहण पूर्णपणे दिसणार आहे.
रिंग ऑफ फायर
१० जूनला दिसणाऱ्या या सूर्यग्रहणाला 'रिंग ऑफ फायर'ही म्हणटले जात आहे. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध चंद्र येतो तेव्हा अशा प्रकारचे सूर्यग्रहण दिसते. या सूर्यग्रहणाला खंडग्रास सूर्यग्रहणही म्हणतात. गोलाकार सूर्यग्रहण तेव्हाच होते जेव्हा चंद्र पृथ्वीपासून सगळ्यात लांब असतो. त्यामुळे चंद्र सूर्याच्या प्रकाशाला अवरोधित करू शकत नाही. परिणामी सूर्याचा प्रकाश चंद्राच्या चारही बाजूने एक गोलाकार वर्तुळासारखा दिसतो.
सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र
सूर्यग्रहण एक खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होते. चंद्राच्या मधोमध येण्यामुळे काही काळासाठी आपल्याला सूर्य दिसत नाही. आणि जरी दिसला तरी तो थोड्याच स्वरुपात दिसतो. चंद्र सूर्याचा पूर्ण किंवा थोड्या प्रमाणात प्रकाश अडवून धरतो. ज्यामुळे पृथ्वीवर अंधार परसतो. ही घटना अमवस्येला घडते.