तिरूवनंतपुरम (केरळ) - देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोना रूग्णसंख्येत घट होत आहे. अनेक राज्यांनी कोरोना नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र काही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर केरळ सरकारने विकेंड लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जवळपास 10 टक्के रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुढील आठवड्यातही विकेंड लॉकडाऊन कायम राहील.
केंद्रीय पथक करणार मार्गदर्शन -
केरळ राज्यात दररोज कोरोनाची रूग्णांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकार सहा जणांचे पथक नियोजनासाठी पाठवण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडीया म्हणाले, तज्ञ लोकांचे पथक केरळ राज्याला मदत करेल. तसेच राज्यात दररोज नव्या रूग्णांची नोंद होत असल्याचे म्हणत चिंता व्यक्त केली. कोरोना रूग्णांच्या आधारावर शिथिलता आणि निर्बंध कायम राहतील. यासाठी ए, बी, सी आणि डी अशी झोननिहाय रचना करण्यात आली आहे. वेगवेगळ्या झोनसाठी वेगवेगळी नियमावली लागू राहील.