चंदिगड (पंजाब) - आपचे राष्ट्रीय समन्वयक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पंजाबमधील आपच्या सर्व आमदारांबरोबर बैठक घेतली. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. यावेळी त्यांनी भगवंत मान यांचे कौतुक ( Kejriwal lauded Bhagwant Mann decision ) केले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 3-4 दिवसांत मान यांनी घेतलेल्या काही निर्णयांची केजरीवाल यांनी प्रशंसा केली.
हेही वाचा - India Corona Update : अनेक देशांत कोरोनाची नवी लाट, भारतात मात्र दोन वर्षांत पहिल्यांद सर्वात कमी रुग्ण वाढ
मान यांनी 3 दिवसांतच काम करून दाखवले - केजरीवाल
भगवंत मान यांनी 16 तारखेला शपथ घेतली होती. त्यांनी तीन दिवसांतच काम करून दाखवले. माजी मंत्र्यांची सुरक्षा हटवून ती जनतेच्या सेवेत लावली. त्याचबरोबर, ऑक्टोबर महिन्यात पिकांचे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचली. 3-4 दिवसांत शेतकऱ्यांना चेक मिळेल, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोहालीमध्ये आप आमदारांसोबत ही बैठक घेतली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आपचे नेते राघव चढ्ढा हेही उपस्थित होते.
पंजाबमध्ये आपचे कामकाज सुरू, इतर 4 राज्यांत अजून सरकारही स्थापन झालेले नाही
केजरीवाल यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. एकीकडे भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली, कामेही सुरू केलीत, मात्र तिकडे ज्या 4 राज्यांमध्ये भाजपने वियज मिळवला तिथे त्यांची अद्याप सरकारही स्थापन झालेली नाही. त्यांची भाडणेच सुरू आहे, असा टोलाही केजरीवाल यांनी भाजपला लगावला.
लोकांची आमच्यावरील आशा आता विश्वासामध्ये बदलत आहे
मुख्यमंत्री केजरीवाल पुढे म्हणाले की, पंजाबमध्ये भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 25 हजार नोकऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे, यामुळे लोकांची आमच्यावरील आशा आता विश्वासामध्ये बदलत आहे.
महिनाभरात भरती होईल - भगवंत मान
यावेळी भगवंत मान यांनी देखील नोकर भरती कधी होणार याबाबत माहिती दिली. आम्ही 25 हजार नोकऱ्यांचे आश्वासन दिले आहे. महिनाभरात भरती होईल, अशी माहिती भगवंत मान यांनी दिली.
हेही वाचा - Threats To Judges : हिजाब प्रकरणी कर्नाटकच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमक्या : २ जणांना अटक