ETV Bharat / bharat

बसवराज बोम्माई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड - new Karnataka Chief Minister appintment

कर्नाटकचे भाजप प्रभारी अर्जुन सिंह म्हणाले, की भाजपच्या आमदारांची मंगळवारी सायंकाळी बैठक बोलाविण्यात आली आहे. कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करणे हा बैठक बोलाविण्यामागे उद्देश आहे. कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव आज (मंगळवारी) जाहीर करण्यात येणार आहे.

Basavaraj Bommai
Basavaraj Bommai
author img

By

Published : Jul 27, 2021, 5:11 PM IST

Updated : Jul 27, 2021, 10:16 PM IST

बंगळुरू - भाजप सरकारने दोन वर्षे कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी खांदेपालट केला आहे. मुख्यमंत्रिपदाचा बी. एस. येडियुराप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. कर्नाटकचे भाजप प्रभारी अर्जुन सिंह यांनी मंगळवारी सांयकाळी नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार बसवराज बोम्माई यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे.

नवनियुक्त मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, की गरिबांच्या लोककल्याणाकरिता काम करणार आहे. हे लोकांचे आणि लोकांकरिता सरकार असणार आहे. कोरोनाशी लढाई आणि राज्यातील पुरस्थितीवर मात करण्यासाठी सर्व उपाययोजना करणार आहे. ते बंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले. बोम्माई हे बुधवारी सकाळी 11 वाजता राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

बसवराज बोम्माई यांनी राज्यपालांची घेतली भेट

भाजप आमदारांच्या बैठकीत मुख्यमंंत्र्यांचे नाव निश्चित

कर्नाटकचे भाजप प्रभारी अर्जुन सिंह म्हणाले, की भाजपच्या आमदारांची मंगळवारी सायंकाळी बैठक बोलाविण्यात आली होती. कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करणे हा बैठक बोलाविण्यामागे उद्देश होती. कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव आज (मंगळवारी) जाहीर करण्यात येणार आले. विधानसभेतील भाजपच्या सभागृह नेत्याचे नावदेखील निश्चित करण्यात येणार आहे. कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री उद्या शपथ घेणार आहेत. त्यानंतर आठवडाभराने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना शपथविधीचे आमंत्रण

हेही वाचा-परमबीर सिंह यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस; एसीबीने केले खंडन

कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कर्नाटकमधील मतांचे जातनिहाय गणित बघता कोणत्या समुदायातील नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अखेर लिंगायत समुदायाला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळाले आहे.

हेही वाचा-ऑगस्ट महिन्यात बँकांना 15 दिवसांची सुट्टी, वेळेत उरकून घ्या कामे

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ही होती नावे-

  • कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत समुदायाचे वर्चस्व निर्विवाद आहे. राज्याच्या सत्तेची गणिते ठरविण्यात लिंगायत समाजाची मते निर्णायक ठरतात. त्यामुळे लिंगायत समाजातील एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रीपद मिळते की लिंगायत समाजाव्यतिरिक्त इतर समुदायातील नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ज्यांची नावे चर्चिली जात आहेत, त्यापैकी मुरुगेश निराणी आणि अरविंद बेल्लाड हे लिंगायत समुदायातील नेते आहेत.
  • कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत समाजानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वोक्कालिगा समुदायातील नेत्यांचीही नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. यात अश्वथ नारायण आणि सीटी रवी यांची नावे येतात. त्यामुळे लिंगायतेतर समुदायातील मुख्यमंत्रीही कर्नाटकात बघायला मिळू शकतो अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती.
  • मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणारे प्रल्हाद जोशी हे ब्राह्मण समुदायातील नेते आहेत. त्यामुळे मतांच्या गणितात त्यांचे पारडे जड नसले तरी केंद्रीय नेतृत्वातील वजन लक्षात घेता त्यांनाही मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

हेही वाचा-सीमावादाच्या घटनेनंतर आसामने जाहीर केला राजकीय दुखवटा; मृताच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत

Last Updated : Jul 27, 2021, 10:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.