बंगळुरू - कर्नाटकमधील भाजप सरकारमधील मंत्री केएस ईश्वरप्पा हे आज (दि. 15 एप्रिल)रोजी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. के. एस. ईश्वरप्पा यांच्यावर गंभीर आरोप केलेल्या भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर विरोधी पक्ष काँग्रेससह इतर काही संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. ( KS Ishwarappa Resign Today ) दरम्यान. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेची दखल घेत कार्यकर्त्याच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले होते. त्यानंतर राज्यात वातावरण ढवळून निघाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज केएस ईश्वरप्पा आपल्या मंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देणार आहेत.
-
Contractor Santosh Patil's death case | State Min KS Eshwarappa has decided to resign on his own & will tender his resignation today evening. No need for opposition to become an investigation officer or judge as everything will come out after probe: Karnataka CM Basavaraj Bommai pic.twitter.com/oHbCljxP8l
— ANI (@ANI) April 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Contractor Santosh Patil's death case | State Min KS Eshwarappa has decided to resign on his own & will tender his resignation today evening. No need for opposition to become an investigation officer or judge as everything will come out after probe: Karnataka CM Basavaraj Bommai pic.twitter.com/oHbCljxP8l
— ANI (@ANI) April 15, 2022Contractor Santosh Patil's death case | State Min KS Eshwarappa has decided to resign on his own & will tender his resignation today evening. No need for opposition to become an investigation officer or judge as everything will come out after probe: Karnataka CM Basavaraj Bommai pic.twitter.com/oHbCljxP8l
— ANI (@ANI) April 15, 2022
-
Karnataka | LoP & former CM Siddaramaiah, along with other Congress members, protests inside the Vidhana Soudha in Bengaluru, demanding state minister K S Eshwarappa's arrest in connection with the death case of contractor Santosh Patil. pic.twitter.com/kd26aqtFnv
— ANI (@ANI) April 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Karnataka | LoP & former CM Siddaramaiah, along with other Congress members, protests inside the Vidhana Soudha in Bengaluru, demanding state minister K S Eshwarappa's arrest in connection with the death case of contractor Santosh Patil. pic.twitter.com/kd26aqtFnv
— ANI (@ANI) April 14, 2022Karnataka | LoP & former CM Siddaramaiah, along with other Congress members, protests inside the Vidhana Soudha in Bengaluru, demanding state minister K S Eshwarappa's arrest in connection with the death case of contractor Santosh Patil. pic.twitter.com/kd26aqtFnv
— ANI (@ANI) April 14, 2022
ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रीपद - ईश्वरप्पा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरुवारी (14 एप्रिल) सांगितले, की मी सर्वांना सहकार्याबद्दल धन्यवाद देतो. मी माझ्या पदाचा राजीनामा देणा आहे. ( Congress leader Rahul Gandhi ) या घडामोडीनंतर ईश्वरप्पा यांच्या रुपात बोम्मई सरकारला हा मोठा धक्का समजला जात आहे. ईश्वरप्पा यांच्याकडे बोम्मई सरकारमध्ये ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रीपद होते.
हेही वाचा - Petrol-Diesel Prices Today : पेट्रोल डिझेलच्या दरात स्थिरता; वाचा आजचे दर
आत्महत्येला ईश्वरप्पा जबाबदार असल्याचा आरोप - संतोष पाटील नामक एका कंत्राटदाराने ईश्वरप्पा यांच्यावर 'कमीशन' मागितल्याचे आरोप केले होते. त्यानंतर मंगळवारी या कंत्राटदाराने कथीत रुपात आत्महत्या केली. (Ishwarappa Is Accused Responsible for Suicide) संतोष पाटील यांचा मृतदेह एका खासगी लॉजच्या खोलीत आढळून आला होता. या ठेकेदाराने पाठवलेल्या व्हॉट्सअॅप संदेशात ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावर पाटील यांच्या आत्महत्येला ईश्वरप्पा जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.
हेही वाचा - RR vs GT IPL 2022 : गुजरात टायटन्सचा राजस्थानवर ३७ धावांनी दणदणीत विजय
आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे - संतोष पाटील आत्महत्या प्रकरण पुढे आल्यानंतर काँग्रेस सातत्याने ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करत होती. संतोष पाटील हे स्वत: आपण भाजप कार्यकर्ते होते. ( Santosh Patil Suicide Case ) संतोष पाटील यांनी 30 मार्च रोजी आरोप केला होता की, ईश्वरप्पा यांनी 40% कमीशन मागितले होते. तसेच, पाटील यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये ईश्वरप्पा यांनाच आपल्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे. या प्रकरणात ईश्वरप्पा यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम 306 अन्वये आत्महत्या आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Gold and Silver Prices Today : सोन्याच्या दरांता वाढ कायम; वाचा किती आहेत दर