ETV Bharat / bharat

कर्नाटक: मुसळधार पावसाने घर कोसळले; बेळगाव जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू

घर कोसळल्याची माहिती मिळताच हिरेबागेवाडीचे स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बलकर या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यांनी मदतकार्यासाठी तातडीने सूचना दिल्या होत्या.

मुसळधार पावसाने घर कोसळले
मुसळधार पावसाने घर कोसळले
author img

By

Published : Oct 7, 2021, 2:35 AM IST

बेळगाव (बंगळुरू) - मुसळधार पावसाने बेळगाव जिल्ह्यातील बादाला अंकालगीमध्ये हाहाकार झाला आहे. पावसाने घर कोसळल्याने तीन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखालून तीन जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घर कोसळल्याची माहिती मिळताच हिरेबागेवाडीचे स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बलकर या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यांनी मदतकार्यासाठी तातडीने सूचना दिल्या होत्या.

हेही वाचा-यंदा नवरात्रीचा सण आठ दिवसांचा; पंचागकर्त्यांनी 'हे' सांगितले कारण

ही आहेत मृतांची नावे

1) गंगाव्वा भिमाप्पा खनागवी - वय-50

2) सत्याव्वा अर्जुन खनागवी- वय-४५

3) पुजा अर्जुन खनागवी - वय-8

4) सविता भिमाप्पा खनागवी - वय-28

5) काशाव्वा विठ्ठल कोलेप्पानावार - वय- 8

6) लक्ष्मी अर्जुन खनागवी - वय- 15

7) अर्जुन हणुमंत खनागवी

हेही वाचा-ठाणे : अंबरनाथ शहरात मुसळधार पावसाने कोसळली भिंत; दोन जणांचा मृत्यू

ठाण्यातही घडली दुर्घटना-

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही भिंत मुसळधार पावसाने कोसळली आहे. मुसळधार पावसामुळे अंबरनाथ पूर्व भागातील महालक्ष्मीननगर गॅस गोडाऊन परिसरात नगरपालिका उद्यानाची आरसीसी बांधकामाची सुरक्षा भिंत कोसळली. ही भिंत अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोविंद केसरकर (३८), प्रविण कदम (३०) अशी जागीच मृत्यू झालेल्या नागरिकांची आहेत. काही नागरिक जखमी झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.