ETV Bharat / bharat

KARGIL VIJAY DIWAS द्रासमध्ये शहीद जवानांचे स्मरण; विविध कार्यक्रमांचे आयोजन

author img

By

Published : Jul 26, 2021, 1:02 AM IST

Updated : Jul 26, 2021, 1:18 AM IST

कारगिल दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. द्रासमधील कार्यक्रमाला शौर्य पारितोषिक विजेते सैन्यदलाचे जवान, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला.

द्रासमध्ये शहीद जवानांचे स्मरण
द्रासमध्ये शहीद जवानांचे स्मरण

श्रीनगर - कारगिल युद्धाला २६ जुलै रोजी २२ वर्षे पूर्ण झाले आहेत. भारताने १९९९ साली कारगिल युद्धात पाकिस्तानवर अविस्मरणीय विजय मिळवला होता. या पार्श्वभूमीवर सैन्यदलाकडून ऑपरेशन विजयची माहिती देणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे द्रासमधील लॅमोचेन भागामध्ये शनिवारी आयोजन करण्यात आले.

टायगर हिल, टोलिलंग आणि पॉईंट ४८७५ या ठिकाणच्या ऐतिहासिक लढ्याची माहिती देण्यात आली. कारगिल दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. द्रासमधील कार्यक्रमाला शौर्य पारितोषिक विजेते सैन्यदलाचे जवान, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला. भारतीय सैन्यदलाच्या वीर योद्धांचे स्मरण करण्यात आले.

शहीद जवानांचे स्मरण
शहीद जवानांचे स्मरण

हेही वाचा-VIDEO : हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनाचा थरारक व्हिडिओ; पूल चक्काचूर, 9 पर्यटकांचा मृत्यू

कारगिल वॉर मेमोरियल येथे बिटिंग द रिट्रिट या कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले. यावेळी वीर योद्धांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. याठिकाणी ५५९ लॅम्प लावण्यात आले. कारगिलमध्ये वीर मरण आलेल्या ५५९ जवानांचे हे स्मरण आहे. द्रासमधील पोलो मैदावर संगीतकार अमन चंद्रा यांनी संगीत कार्यक्रमातून वीर जवानांच्या शौर्याचे स्मरण केले. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित शेरशाह हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामधील मा तेरे कसम हे नॉर्थन कमांडची संकल्पेवर आधारित असल्याची माहिती डिफेन्स जनसंर्क अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा-पूर परिस्थितीमुळे राज्यात 149 जणांचा मृत्यू, तर 64 जण अद्यापही बेपत्ता

Last Updated : Jul 26, 2021, 1:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.