ETV Bharat / bharat

Kargil Vijay Diwas 2023:  पाक असो चीन सर्वांशी मुकाबला करण्यास सैन्य सिद्ध - माजी लष्करप्रमुख व्हीपी मलिक - लेफ्टनंट जनरल वायके जोशी यांना वीर चक्र प्रदान

आज कारगिल विजयाचा 24 वा वर्धापन दिन असून संपर्ण देशात हा दिवस साजरा केला जात आहे. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर लष्कराकडून लामोचेन (द्रास) येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माजी लष्करप्रमुख व्हीपी मलिक आणि लेफ्टनंट जनरल वायके जोशी यांनी युद्धाच्या आठवणी सांगितल्या आहेत.

कारगिल विजय दिवस
कारगिल विजय दिवस
author img

By

Published : Jul 26, 2023, 8:00 AM IST

Updated : Jul 26, 2023, 9:56 AM IST

नवी दिल्ली : भारताने कारगिलच्या उंच शिखरावर पाकिस्तानी सैन्याचा पराभव करत विजयाचा तिरंगा फडवला. या घटनेला आज 24 वर्ष झाले असून आज संपर्ण देशात कारगिल विजयाचा 24 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस लष्कराच्या वर्दीतील शूरवीरांना ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले त्यांना स्मरण करण्याचा एक पवित्र दिवस आहे. कारगिल साजरा करत असताना माजी लष्करप्रमुख आणि कारगिल लढ्यातील शूरवीर लेफ्टनंट जनरल वायके जोशी (निवृत्त) यांनी लष्काराच्या आठवणी सांगितल्या आहेत.

  • #WATCH | Ladakh: The music band of Ladakh Scouts, played song 'Desh Mere' at a cultural program organised in Dras ahead of Kargil Vijay Diwas. (25.07) pic.twitter.com/ZfqOcFtsMr

    — ANI (@ANI) July 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

24वा वर्धापन दिन: कारगिल विजय दिवसाच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय सैन्याकडून मंगळवारी लामोचेन (द्रास) येथे एक ब्रीफिंग आयोजित करण्यात आली होती. भारतीय लष्कराने या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवारी या कार्यक्रमाची सुरुवात कारगिल युद्ध स्मारक येथे झाली. या सोहळ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज भारतीय लष्कराच्या जवानांसोबत सहभागी होणार आहेत. युद्धातील वीर आणि वीर नारी, वीर माता आणि युद्धादरम्यान प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम होणार आहे. कारगिल विजय दिवस दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो.

शूरवीरांची आठवण: मंगळवारी कार्यक्रमाची सुरुवात कारगिल युद्धाच्या व्हिडिओतून करण्यात आली. कारगिल युद्धात भारतीय सैन्याने अत्यंत आव्हानात्मक भागात कठोर हवामानाशी दोन हात करत शत्रूचा सामना केला. यामुळे द्रास,कारगिल आणि बटालिक सेक्टरमध्ये शत्रूचा पराभव केला. ज्या पर्वतरांगामध्ये भारतीय सैनिकांनी शत्रूचा पराभव केला. ज्या पर्वतरांगामध्ये लढाई झाली,त्याच्या वर्णनाने अनेकांच्या अंगावर शहारे आले. युद्धाच्या कथनांनी स्वतः युद्धवीरांनी केलेल्या कृत्यांची आठवण करून दिली. यामुळे आपल्या शूरवीरांचे शौर्य व चिरंतन उत्साह परत एकदा दिसून येत आहे.

काय म्हणाले माजी लष्करप्रमुख: या दिवसाच्या पार्श्वभूमीवर जनरल (निवृत्त) वेद प्रकाश मलिक आणि कारगिल युद्धाचा अजून एक नायक लेफ्टनंट जनरल वायके जोशी (निवृत्त) यांनी प्रतिक्रिया दिली. लेफ्टनंट जनरल वायके जोशी यांनी कर्नल म्हणून 13व्या जेएके रायफल्सचे नेतृत्व केले आहे. त्यांना त्यांच्या सेवेबद्दल वीरचक्र देण्यात आले आहे. तर वेद प्रकाश मलिक हे पाकिस्तान विरुद्ध 1999 च्या कारगिल युद्धात लष्करप्रमुख होते. यावेळी त्यांनी त्यांच्या सैन्याच्या विजयाची अभिमानाने आठवण दिली. लडाखमधील कारगिल युद्ध स्मारक येथे बोलताना जनरल मलिक म्हणाले-

हे ठिकाण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मला सशस्त्र दलांचा विशेषत: भारतीय सैन्याचा अभिमान वाटतो, ज्याचे मी त्यावेळी नेतृत्व करत होतो. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी ज्या पद्धतीने जमिनीवर कब्जा केला, त्यावरून आपल्या सैन्याचे खरे स्वरूप दिसून आले. ज्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले, अशा लोकांमध्ये असण्याचा मला खूप सन्मान वाटतो."- जनरल (निवृत्त) वेद प्रकाश मलिक

कोणीही वाईट नजरेने पाहणार नाही : आपल्या देशाचै सैन्यदल आता पूर्वीपेक्षा मजबूत झाली आहे. कारगिल सीमेवर खूप विकास झाला आहे. कारगिलच्या आजूबाजूला सर्वत्र रस्ते बांधण्यात आले आहेत. येथे लष्कर यायला वेळ लागणार नाही. आता कोणतीही दहशतवादी शक्ती आपल्या देशाकडे डोळे वटारण्याची हिंमत करणार नाही. सर्व सीमाभागातील रस्ते बांधण्यात आले आहेत. याच्या मदतीने आपले सैन्य कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सीमेवर सहज पोहोचू शकते, असेही मत माजी लष्करप्रमुख व्हीपी मलिक यांनी मांडले आहे. पुढे बोलताना माजी लष्करप्रमुख व्हीपी मलिक म्हणाले की, आपल्या देशाचे सैन्य 24 वर्षात स्वयंपूर्ण झाले आहे. जवानांची दळणवळणाची साधनेही हायटेक झाली आहेत. आपल्या देशात शस्त्रे देखील आधुनिक आहेत. आता आपण कोणाशीही मुकाबला करू शकतो. भारताचे सैन्य चीन आणि पाकिस्तानसह सर्व देशांशी मुकाबला करण्यास सक्षम झाले आहे. जल, भूदल आणि हवाई दलांनाही हायटेक शस्त्रे आणि विमाने सज्ज करण्यात आली असल्याचे मलिक म्हणाले.

मला वाटतं की हे कालच्यासारखे आहे, आपल्यापैकी बर्‍याच जणांसाठी विशेषत: ज्या आईंनी आपला मुलगा गमावला आहे, त्यांच्यासाठी हा कठीण काळ होता. ही कठीण आठवण घेऊन जगणे आहे, परंतु मला अभिमान वाटतो कारण अनेक लष्करी अधिकारी मला सांगतात की, विक्रम त्यांची प्रेरणा आहे. ते केवळ त्यांच्यामुळेच सैन्यात सामील झाले-कॅप्टन विक्रम बत्राचे जुळे भाऊ विशाल बत्रा

  • #WATCH | Ladakh: Four MIG 29 aircraft fly past the Kargil War Memorial in Drass on Kargil Vijay Diwas. Tributes are being paid to soldiers who lost their lives in the 1999 Kargil War. pic.twitter.com/E45ugpTFiU

    — ANI (@ANI) July 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोक्याची शिखरे ताब्यात घेतली: कारगिल युद्ध हे भारतासाठी महत्त्वाचे आहे. अत्यंत आव्हानात्मक प्रदेशात खडतर हवामान असताना भारतीय लष्कराने येथे विजय मिळवला. भारताने द्रास, कारगिल आणि बटालिक सेक्टरमध्ये शत्रू पाकिस्तानचा पराभव केला. या युद्धात भारतीय सैन्याने टोलोलिंग, टायगर हिल आणि पॉइंट 4875 ही मोक्याची शिखरे पुन्हा ताब्यात घेतली.

आम्ही हे युद्ध लढले ज्यामध्ये मोठी आव्हाने होती, भूभाग इतका आव्हानात्मक आहे, शून्याखालील तापमान आणि ऑक्सिजनची कमतरता आणि दारूगोळ्याच्या पॅकसह हे सर्व करणे अधिक कठीण आहे. शत्रूलाही डोंगराच्या माथ्यावर असण्याचा फायदा होता. परंतु आम्ही हल्ला करून ती सर्व शिखरे परत मिळवली-लेफ्टनंट जनरल जोशी

Last Updated : Jul 26, 2023, 9:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.