ETV Bharat / bharat

Kangana Ranaut : चित्रपट फ्लॉप  झाल्यानंतर कंगणा राजकारणाच्या मैदानात? 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे दिले संकेत - लोकसभा निवडणूक

Kangana Ranaut : बॉलिवूड क्वीन कंगना राणौतने लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. जाणून घ्या कंगना रणौत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकते.

अभिनेत्री कंगना रणौत
अभिनेत्री कंगना रणौत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 12:57 PM IST

शिमला (हिमाचल प्रदेश) Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणलंय. ती मूळची हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील आहे. शुक्रवारी कंगनानं गुजरातमधील द्वारका येथे राजकीय इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले होते. जर भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले तर ती पुढील लोकसभा निवडणूक लढवेल, असं कंगणानं म्हटले.

हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून मिळू शकते उमेदवारी : कंगना राणौत गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रातील भाजप सरकारचं आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सातत्यानं कौतुक करत आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत भाजप कंगनाला मंडी मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. जातीय समीकरणानुसार या जागेवर राजपूत आणि अनुसूचित जातीचे मतदार जास्त आहेत. कंगना राणौतही राजपूत आहे. कंगनाचं वडिलोपार्जित घर मंडी जिल्ह्यातील भांबला इथं असल्यानं ही चर्चा अधिक बळावलीय. सध्या ती कुल्लू येथील तिच्या नवीन घरात काही वर्षांपासून राहत आहे.

  • कुछ दिनों से हृदय बहुत व्याकुल था, ऐसा मन हुआ कि द्वारिकाधीश के दर्शन करूँ, श्री कृष्ण की इस दिव्य नगरी द्वारिका में आते ही, यहाँ की धूल मात्र के दर्शन से ऐसा लगा कि मेरी सारी चिन्तायें टूट कर मेरे कदमों में गिर गई हों।
    मेरा मन स्थिर हो गया और अनंत आनंद की अनुभूति हुई।
    हे… pic.twitter.com/MUOy9KmyTI

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) November 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • कंगनाचं कुटुंब काँग्रेसशी जोडलेलं : अभिनेत्री कंगना राणौतचे कुटुंब फार पूर्वीपासून काँग्रेस पक्षाशी जोडलं गेलेलं आहे. कंगनाचे आजोबा सरजू सिंग हे स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होते. ते काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य होते. हिमाचल प्रदेशला प्रादेशिक परिषदेचा दर्जा मिळाला तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. ते 1963 ते 1967 पर्यंत सदस्यही होते.

भगवान कृष्णाचा आशीर्वाद असेल तर मी लोकसभा निवडणूक लढवणार : कंगना शुक्रवारी भगवान कृष्णाच्या प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेली होती. दरम्यान, पत्रकारांनी तिला पुढील लोकसभा निवडणूक लढवणार का, असं विचारलं असता कंगना म्हणाली, “श्री कृष्णाची इच्छा असेल तर मी निवडणूक लढवीन.” तसंच 600 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत रामाच्या पुतळ्याचा अभिषेक शक्य केल्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे कौतुक केलंय. अभिनेत्री म्हणाली की, भाजप सरकारच्या प्रयत्नांमुळे 600 वर्षांच्या संघर्षानंतर आम्हा भारतीयांना हा दिवस पाहायला मिळाला. मोठ्या थाटामाटात मंदिराची स्थापना करू. धर्माचा झेंडा जगभर फडकावा असही कंगना राणौत म्हणाली.

  • कंगनाचा 'तेजस' फ्लॉप : कंगना राणौत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'तेजस' या चित्रपटात दिसली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालाय. सुमारे 45 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्याच्या कलेक्शनसाठी खूप संघर्ष करत आहे. तसंच तिचे मागील काही चित्रपट फ्लॉप झाल्यानं तीनं राजकारणात येण्याचे संकेत दिल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.

हेही वाचा :

  1. Parliament Special Session : महिला आरक्षणाचा निर्णय ऐतिहासिक, कंगना रणौतची प्रतिक्रिया, इशा गुप्ता निवडणूक लढवणार?
  2. Kangana Ranaut Visits Dwarkadhish: कंगना रणौतनं गुजरातेत जाऊन द्वारकाधीशला घातलं आशीर्वादासाठी साकडं
  3. Tejas X review : कंगनाच्या 'तेजस'ला थंड सुरुवात, बॉक्स ऑफिसवर अपेक्षेहून कमी प्रतिसाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.