ETV Bharat / bharat

JEE Main 2023 : 'जेईई मेन' चे माहितीपत्रक जाहीर; जाणून घ्या कधी असणार परीक्षा - JEE Main brochure released

२०२३ मध्ये होणाऱ्या जेईई मेन (Jee Main 2023) परीक्षेची तारीख नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) जाहीर (Jee Main 2023 Dates Declared) करण्यात आली आहे. यातील पाहिले सत्र जानेवारी २०२३ मध्ये असेल, तर दुसरे सत्र एप्रिल २०२३ मध्ये असेल. जाणुन घेऊया सविस्तर.

JEE Main 2023
जेईई मेन परीक्षेची तारीख जाहीर
author img

By

Published : Jan 8, 2023, 1:51 PM IST

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) २०२३ मध्ये होणाऱ्या जेईई मेन (Jee Main 2023) परीक्षेची तारीख जाहीर (Jee Main 2023 Dates Declared) झाली आहे. याबाबत एक माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार २०२३ मध्ये जेईई मेन परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. यातील पाहिले सत्र जानेवारी २०२३ मध्ये असेल, तर दुसरे सत्र एप्रिल २०२३ मध्ये असेल.

शेवटची तारीख 12 जानेवारी २०२३ : १५ डिसेंबरपासून २०२३ मधील पहिल्या सत्रासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. तर या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेची शेवटची तारीख 12 जानेवारी २०२३ असेल. अंडरग्रॅज्युएट इंजीनिअरिंग प्रोग्रॅम्ससाठी अर्ज करणारे विद्यार्थी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अधिक माहिती मिळवू शकतात.

परीक्षेत दोन पेपर असतील : २०२३ मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याबरोबर एनटीएने याबाबत अधिक माहिती देत सांगितले की, ‘जेईई मेन परीक्षेत दोन पेपर असतील. पेपर १ (BE/BTech) हा पेपर एनआयटी, आयआयटी, सीएफटीआय, राज्य सरकारची मान्यता/निधी देण्यात आलेल्या युनिव्हार्सिटी/ संस्थांमध्ये अंडरग्रॅज्युएट इंजीनियरिंग प्रोग्राम्ससाठी प्रवेश मिळवण्यासाठी असेल. हा पेपर जेईई (ऍडव्हान्स) साठी पात्रता परीक्षेच्या स्वरूपात असेल. दुसरा पेपर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि बॅचलर ऑफ प्लॅनिंग यासाठी प्रवेश मिळवण्यासाठी असेल.

दोन सत्रात असणार परिक्षा : या परीक्षेच्या संभाव्य तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. २०२३ जानेवारी मधील पाहिले सत्र २४ जानेवारी ते ३१ जानेवारी यादरम्यान असेल. तर २०२३ मधील दुसरे सत्र ६ एप्रिल ते १२ एप्रिलच्या दरम्यान असेल. विद्यार्थ्यांनी या गोष्टींची नोंद घ्यावी. याशिवाय जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे शहर जाहीर केले जाणार आहे.

JEE 2023 कशी करावी नोंदणी : नोंदणीसाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट- jeemain.nta.nic.in वर जा. त्यानंतर वेबसाइटच्या होम पेजवर दिलेल्या JEE मेन 2023 सत्र 1 पर्यायावर जा. यामध्ये तुम्हाला JEE (मुख्य) 2023 सत्र 1 अर्जाच्या लिंकवर जावे लागेल. आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा. यानंतर, विनंती केलेले तपशील भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज भरू शकता. अर्ज पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट काढा.

परिक्षेचे स्थळ करुन घ्या माहिती : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परीक्षा 24 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत घेतली जाईल. 12 जानेवारीनंतर परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले जाईल. याशिवाय जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे शहर जाहीर केले जाणार आहे. JEE Mains या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी परीक्षेसाठी जारी केलेली संपूर्ण सूचना तपासू शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.