श्रीनगर : जम्मूच्या ( Jammu Kashmir ) उपायुक्त अवनी लवासा ( Avni Lavasa Deputy Commissioner of Jammu ) यांनी मंगळवारी एक मोठी घोषणा केली. जम्मूमध्ये एक वर्षाहून अधिक काळ राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची नवीन मतदार म्हणून ( Elections Voter List ) नोंदणी करावी, असे आदेश त्यांनी दिले.त्यांच्या निर्णयानंतर जर बाहेरचा कोणीही जम्मूमध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ राहिला तर त्याला मतदानाचा अधिकार मिळेल.
-
Letter issued by Deputy Commissioner of Jammu for acceptance of documents for registration as electors authorizes all tehsildars to issue certificate of residence to people residing in Jammu "for more than one year." pic.twitter.com/V958ZAQilm
— ANI (@ANI) October 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Letter issued by Deputy Commissioner of Jammu for acceptance of documents for registration as electors authorizes all tehsildars to issue certificate of residence to people residing in Jammu "for more than one year." pic.twitter.com/V958ZAQilm
— ANI (@ANI) October 12, 2022Letter issued by Deputy Commissioner of Jammu for acceptance of documents for registration as electors authorizes all tehsildars to issue certificate of residence to people residing in Jammu "for more than one year." pic.twitter.com/V958ZAQilm
— ANI (@ANI) October 12, 2022
यादीत नवीन मतदारांचा समावेश : त्याचबरोबर या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरच्या राजकारणात भूकंप झाला आहे. या आदेशावर तेथील राजकीय पक्ष आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. याला नॅशनल कॉन्फरन्सने कडाडून विरोध केला आहे. नॅशनल कॉन्फरन्सने नाराजी व्यक्त करताना सांगितले की, केंद्रातील मोदी सरकार जम्मू-काश्मीरच्या मतदार यादीत २५ लाख नवीन मतदारांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहे. जारी केलेल्या निवेदनात एनसीने म्हटले आहे की सरकार 25 लाख गैर-स्थानिक लोकांना मतदार यादीचा भाग बनवणार आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे. भाजपला निवडणुकीची भीती वाटते, त्याचा पराभव होणार आहे, हे त्यांना माहीत आहे. भाजपचा हा डाव जनतेने मतपेटीतून हाणून पाडावा आहे.
निवडणुकेचे दिले होते संकेत :जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. नुकतेच गृहमंत्री अमित शहा यांनीही जम्मूचा दौरा केला होता, त्यांनीही दौरात लवकरच निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले होते.