जालंधर (पंजाब) : जालंधरचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. दरम्यान, चौधरी हे भारत जोडो यात्रेत सामिल झाले होते. सध्या भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये आहे. काल शुक्रवार भारत जोडो यात्रेला जालंधर येथून यात्रेला सुरुवात झाली. या दरम्यान अचानक खासदार संतोखसिंग चौधरी बेशुद्ध पडल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांनी तपासणी करण्यात आली. दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेनंतर भारत जोडो यात्रा मध्यंतरी थांबवण्यात आली होती.
डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले : पंजाबमधील जालंधरचे काँग्रेस खासदार चौधरी संतोख सिंग चौधरी लुधियानाला येथून ते काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधीं यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत चालत होते. या यात्रेत त्यांनी अचानक छातीत दुखू लागल्याचे सांगितले. तसेच, त्यांना मोठ्या प्रमाणात घाम फुटला होता. त्याचवेळी ते चालताना खाली पडले. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यानंतर त्यांना घाईघाईत संतोख सिंग यांना फगवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर तेथील डॉक्टरांनी चौधरी यांना त्यांना मृत घोषीत केले.
कोण आहेत संतोख सिंह चौधरी : संतोख सिंह चौधरी यांचा जन्म (१८ जून १९४६ )रोजी झाला होता. ते पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि जालंधर लोकसभा मतदारसंघातून खासदारही राहिले आहेत. (2014)च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली होती. याशिवाय (2019)मध्ये ते लोकसभेचे खासदारही होते. सध्या जालंधर लोकसभा मतदारसंघातून त्यांचा संसदीय कार्यकाळ सुरू होता. दरम्यान, यापूर्वी, त्यांनी फिल्लौर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत (1992 ते 1997) या काळात काँग्रेस सरकारमध्ये राजिंदर कौर भट्टल आणि हरचरण सिंग ब्रार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले होते.
मृतदेह जालंधर येथे नेण्यात येणार : खासदार चौधरी संतोख सिंह यांचे पार्थिव त्यांच्या जालंधर शहरातील न्यू विजय नगर येथील निवासस्थानी आणले जाणार आहे. तेथे अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवले जाणार आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वाती ही भारत जोडो यात्रा सकाळी सात वाजता लोडोवाल येथून सुरू होणार होती. ही यात्रा जालंधरमधील गोराया येथे सकाळी 10 वाजता पोहोचणार होती. येथे दुपारच्या जेवणानंतर दुपारी ३ ते ६ या वेळेत यात्रा निघणार होती. त्यानंतर ती फगवाडा बस स्थानकाजवळ संध्याकाळी ६ वाजता मुक्कामी थांबणार होती. परंतु, ही दुर्दैवी घटना घडल्याने यात्रेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.