ETV Bharat / bharat

J and K Explosion : जम्मू-कश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ स्फोट, पोलीस पथक घटनास्थळी दाखल

29 मार्च रोजी रात्री 09:30 च्या सुमारास हिरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय सीमेजवळील बॉर्डर पोलीस पोस्ट संन्याल जवळील गव्हाच्या शेतात स्फोटाचा आवाज ऐकू आला. माहिती मिळाल्यानंतर, कठुआचे एसएसपी शिवदीप सिंह यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आणि लवकरच शोध मोहीम सुरू केली.

J and K Explosion
जम्मू-कश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ स्फोट
author img

By

Published : Mar 30, 2023, 11:09 AM IST

कठुआ (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील हिरानगरमध्ये बुधवारी रात्री स्फोट झाला. हिरानगरमध्ये मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी उशिरा कठुआ जिल्ह्यातील हिरानगर येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर बॉर्डर पोलीस चौकी सन्यालजवळ स्फोटासारखा आवाज ऐकू आला. हा स्फोट रात्री १० वाजण्याच्या सुमारास झाला.

पोलीस पथक घटनास्थळी दाखल : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील हिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्फोटाचा आवाज ऐकू आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. स्फोटाची माहिती मिळताच एसएसपी कठुआ शिवदीप सिंह यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शोध मोहीम सुरू केली. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, प्राथमिक शोधादरम्यान असे आढळून आले आहे की कोणत्याही वस्तू किंवा मनुष्याची हालचाल आढळली नाही.

पुढील तपास सुरू केला जाईल : एसएसपी कठुआ शिवदीप सिंह म्हणाले, आम्हाला मोठ्या आवाजाच्या स्फोटाची माहिती मिळताच आमच्या पोलिस पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहीम सुरू केली, असे एसएसपी कठुआ शिवदीप सिंह यांनी सांगितले. मात्र, सीमेपलीकडून घुसखोरी होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. आमच्या फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून नमुने गोळा केल्यामुळे सकाळी पुढील तपास सुरू केला जाईल, असेही ते म्हणाले.

गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : सन्याल गावात राहणारे स्थानिक रहिवासी राम लाल कालिया यांनी सांगितले की, स्फोटामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीर पोलिसांनी दक्षिणेतील जश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित दोन दहशतवादी साथीदारांना अटक केल्याचा दावा केला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपी जैशच्या साथीदारांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. पोलिस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पुलवामामध्ये शस्त्रास्त्रांच्या खेपेच्या डिलिव्हरीच्या विशिष्ट इनपुटवर, पुलवामा पोलिस आणि आर्मी यांचा समावेश असलेली एक संयुक्त टीम तयार करण्यात आली. टीम वेगवेगळ्या संशयास्पद ठिकाणी तैनात करण्यात आली.

हेही वाचा : US School Shooting : अमेरिकेतील शाळेत महिलेचा अंदाधुंद गोळीबार! 3 लहान मुलांसह 6 जण ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.