ETV Bharat / bharat

Weather Forecast in India : देशात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार -हवामान विभाग - Rainfall In North East

शनिवारी हिमाचल प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकात हलका पाऊस झाला. ( Weather Forecast in India ) पुढील २४ तासांत, छत्तीसगड आणि आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

देशात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार -हवामान विभाग

author img

By

Published : Apr 24, 2022, 10:57 AM IST

नई दिल्ली: दिल्लीमध्ये शनिवारी किमान तापमान २०.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा तीन अंशांनी कमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8.30 वाजता आर्द्रतेची पातळी 44 टक्के नोंदवण्यात आली. दिवसभर जोरदार वारे वाहण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. ( Weather updates today ) कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सिक्कीमच्या काही भागात हलका पाऊस - स्कायमेट हवामानानुसार, मान्सूनपूर्व क्रियाकलापांमुळे देशभरातील उष्णतेची लाट कमी झाली आहे. गेल्या २४ तासांत ईशान्य भारत, केरळ, तामिळनाडू आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम स्वरुप पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. ( India weather report today ) गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि सिक्कीमच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हिमाचल प्रदेश, ओडिशा, गंगेचे पश्चिम बंगाल, तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकात हलका पाऊस झाला आहे.

येत्या ४८ तासांत देशातील अनेक भागात उष्ण लाटे - पूर्वेकडील वारे कोरड्या आणि उष्ण वारे येत आहे. गेल्या २४ तासांत तापमानात वाढ झाली आहे. उत्तर पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील बहुतांश भागात तापमानात हळूहळू वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या २४ तासांत तापमानात वाढ झाली आहे. येत्या ४८ तासांत देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचे पुनरागमन होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता - पुढील 24 तासांसाठी, उत्तर अफगाणिस्तान आणि उत्तर पाकिस्तानच्या लगाताच्या भागांवर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे. नैऋत्य राजस्थान आणि पाकिस्तानच्या लगतच्या भागांवर चक्रीवादळाचे सावट कायम आहे. मध्य महाराष्ट्रापासून मन्नारच्या आखातापर्यंत आतील कर्नाटकात पसरले आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत छत्तीसगड आणि आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागांमध्ये मध्यम वाऱ्यांसह पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उष्णतेची लाट येण्याची शक्यता - अरुणाचल प्रदेश आणि तेलंगणाच्या वेगळ्या भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. कर्नाटक, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या काही भागात एक किंवा दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. ओडिशा, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात आणि दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेशात एक किंवा दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - PM Modi To Visit J-K Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-साश्मीर दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.