ETV Bharat / bharat

Internet Services Suspended in Howarh : नुपूर शर्मा विरोधातील निदर्शनानंतर हावडामध्ये 3 दिवसांसाठी इंटरनेट बंद - पश्चिम बंगाल लाईव्ह न्यूज

भवानी भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हावडामधील अनेक ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळपासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंसा भडकावू शकणार्‍या कोणत्याही प्रकारच्या बनावट व्हिडीओचे प्रसार थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, फोन किंवा एसएमएसवर कोणतीही बंदी नव्हती. ( Internet services to be suspended in Howarh )

Internet services to be suspended in Howarh
हावडामध्ये 3 दिवसांसाठी इंटरनेट बंद
author img

By

Published : Jun 11, 2022, 10:45 PM IST

हावडा (पश्चिम बंगाल) - पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. हावडा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा तीन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. हावडा येथील कोना एक्सप्रेसवेवरून निदर्शने सुरू झाली होती. नंतर ती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सलाप, डोमजूर आणि इतर अनेक ठिकाणी पसरली. हावडा पोलीस आणि आरएएफच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यापूर्वी प्रयत्न केले. नमाजनंतर अचानक सुरू झालेले निदर्शने रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होते. ( Internet services to be suspended in Howarh )

या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले आहे की, “यामागे काही राजकीय पक्ष असून त्यांना दंगल हवी आहे. या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. कठोर कारवाई सुरू केली जाईल. भाजपने पाप केले, जनता भोगेल.” केवळ हावडाच नाही तर पार्क सर्कस आणि त्याच्या लगतच्या भागांसह शहरातील अनेक भागांमध्ये व्यापक निदर्शने झाली. जिथे शर्माच्या अटकेची मागणी करणाऱ्या आंदोलकांना निष्प्रभ करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय - भवानी भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हावडामधील अनेक ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळपासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंसा भडकावू शकणार्‍या कोणत्याही प्रकारच्या बनावट व्हिडीओचे प्रसार थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, फोन किंवा एसएमएसवर कोणतीही बंदी नव्हती.

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारपासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीबद्दल राज्याच्या मुख्य सचिवांकडून तातडीने वैयक्तिक अपडेट मागितले आहेत. "मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना कडक ताकीद देतील अशी अपेक्षा आहे, त्यांना सोडले जाणार नाही," धनकर यांनी ट्विट केले.

हेही वाचा - Designer Pratyusha Suicide : प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषाची आत्महत्या; रुममध्ये मिळाली सुसाईड नोट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.