नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) इन्फ्लूएंझा A उपप्रकार H3N2 हा भारतातील वाढत्या श्वसन आजाराचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबरपासून ते आजपर्यंतच्या डेटा द्वारा त्यांना इन्फ्लूएंझा A H3N2 च्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली दिसली आहे. सुमारे अर्धे रुग्ण गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) ते प्रभावित आहेत.
बहुतेक रुग्णांना दवाखान्याची गरज : इन्फ्लूएंझा A H3N2 च्या क्लिनिकल वैशिष्ट्यांवर भर देताना, आयसीएमआरने म्हटले आहे की, इतर इन्फ्लूएंझा उपप्रकारांपेक्षा हा उपप्रकार अधिक हॉस्पिटलायझेशनला कारणीभूत आहे. इंफ्लूएंझा A H3N2 असलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रूग्णांपैकी, सुमारे 92 टक्के तापाने, 86 टक्के खोकल्याने, 27 टक्के श्वासोच्छवासाने, 16 टक्के घरघरीने त्रस्त आहेत. या व्यतिरिक्त, 16 टक्के लोकांना न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली आहेत आणि 6 टक्के लोकांना फिट येतात. तसेच, H3N2 असलेल्या रुग्णांपैकी 10 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते आणि 7 टक्के रुग्णांची आयसीयूमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता असते, असे आयसीएमआरने सांगितले.
घ्यावयाची काळजी : आयसीएमआरने लोकांना नियमितपणे हात धुवायला आणि सार्वजनिक ठिकाणी हस्तांदोलन करायला व थुंकणे टाळायला सांगितले आहे. आयसीएमआरने सुचवले आहे की, साबण आणि पाण्याने हात धुवा. लक्षणे असल्यास गर्दीची ठिकाणे टाळा आणि मास्क घाला. शिंकताना आणि खोकताना तोंड आणि नाक झाका. भरपूर द्रवपदार्थ घ्या. नाक आणि डोळ्याला स्पर्श करणे टाळा. तसेच ताप आणि शरीरदुखीसाठी पॅरासिटामॉल घ्या. ते पुढे असेही म्हणाले की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स किंवा इतर औषधे घेणे टाळा. तसेच इतरांच्या जवळ बसून खाऊ नका.
H3N2 च्या केसेस मध्ये वाढ : डॉ डांग्स लॅबचे सीईओ डॉ. अर्जुन डांग यांच्या मते, H3N2 इन्फ्लूएंझा प्रकरणे H1N1 च्या तुलनेत जास्त नोंदवली जात आहेत. ते म्हणाले की, 'गेल्या काही आठवड्यांमध्ये आम्ही 100 पेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत. यापैकी बर्याच चाचण्या H3N2 साठी पॉझिटिव्ह आहेत. हे दखलपात्र आहे की आम्हाला H1N1 पॉझिटिव्ह केसेस कमी येत आहेत.'
हेही वाचा : World Obesity Day 2023 : जगासमोरचे सगळ्यात मोठे आरोग्य संकट बनले लठ्ठपणा; कशी घ्यावी काळजी