इंदौर (मध्य प्रदेश) - इंदौरमधील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर ( Ahilyabai Holkar Airport ) इंडिगोच्या फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशाने ( Women Chaos At Indore Airport ) गोंधळ घातला. यावेळी महिला आणि विमानतळ कर्मचाऱ्यामध्ये जोरदार वादावादी झाली. वाद वाढत असल्याचे पाहून प्रशासनाकडून उड्डाण थांबवण्यात आले. अखेर ४० मिनिटांनी विमान इंदौरहून ( Indore Delhi Flight Late Due To Women Chaos ) दिल्लीला रवाना झाले.
प्रवाशांचे सामान तपासले - इंडिगोची फ्लाइट क्रमांक 6E6013 इंदौर विमानतळावरून दिल्लीसाठी निघणार होती. मात्र, यादरम्यान विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच एका महिलेने गोंधळ घातला. विमान थांबवून प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. प्रवाशांनी गोंधळ घालण्याची ही पहिलीच घटना नाही. इंदौर विमानतळावरही अशा घटना समोर आल्या आहेत. विमानतळावर एका महिला प्रवाशाने इंडिगो एअरलाइन्सच्या काउंटरवर दारूच्या नशेत गोंधळ घातला होता. त्यानंतर एअरलाइन्सने महिलेला प्रवास करण्यापासून रोखले.
हेही वाचा - Silver Oak Attack : ..म्हणजे तुम्ही पवारांचं मुंडकं उडवण्याची भाषा करताय : जितेंद्र आव्हाड आक्रमक