ETV Bharat / bharat

अमेरिकेत भारतीयांचा दबदबा वाढला - जो बायडेन - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष

नासाच्या संशोधकांसोबत साधलेल्या व्हर्चुअल संवादादरम्यान बायडेन प्रशासनातील भारतीयांच्या सहभागाबद्दल बोलले. "भारतीय अमेरिकन नागरिकांचे प्रशासनातील वर्चस्व वाढत आहे. तुम्ही(स्वाती मोहन), उपराष्ट्राध्यक्ष(कमला हॅरीस), माझे भाषण लिहिणारे(विनय रेड्डी) हे सर्वच जण भारतीय वंशाचे आहेत." असे बायडेन म्हणाले.

अमेरिकेत भारतीयांचा दबदबा वाढला - जो बायडेन

author img

By

Published : Mar 5, 2021, 10:30 AM IST

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रशासनातील भारतीय वंशाच्या नागरिकांच्या वाढत्या सहभागाविषयी गौरवोद्गार काढले. अमेरिकन प्रशासनात भारतवंशीयांचा वाढता सहभाग दिसून येत असून अनेक महत्वाची पदे ते सांभाळत आहेत असे बायडेन म्हणाले.

बायडेन यांच्याकडून गौरवोद्गार

नासाच्या संशोधकांसोबत साधलेल्या व्हर्चुअल संवादादरम्यान बायडेन प्रशासनातील भारतीयांच्या सहभागाबद्दल बोलले. "भारतीय अमेरिकन नागरिकांचे प्रशासनातील वर्चस्व वाढत आहे. तुम्ही(स्वाती मोहन), उपराष्ट्राध्यक्ष(कमला हॅरीस), माझे भाषण लिहिणारे(विनय रेड्डी) हे सर्वच जण भारतीय वंशाचे आहेत." असे बायडेन म्हणाले. नासाच्या मार्स 2020 मोहिमेच्या दिशादर्शन आणि नियंत्रण प्रणालीचे नेतृत्व स्वाती मोहन करीत आहेत.

बायडेन प्रशासनाचा विक्रम

राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या 50 दिवसांतच बायडेन यांनी 55 भारतवंशीयांची महत्वाच्या पदांवर नेमणूक केली आहे. अमेरिकन प्रशासनात एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतवंशीयांच्या नियुक्तीचा विक्रमच बायडेन यांनी केला आहे. अमेरिकन प्रशासनातील भारतीयांच्या वाढत्या सहभागामुळे अमेरिकेत भारतीयांचा दबदबा वाढल्याचे आता बोलले जात आहे.

भारतीय समुदायाला अभिमान

भारतीय अमेरिकन नागरिक लोकांच्या सेवेसाठी किती उत्सुक आहेत हेच यातून दिसून येत असून भारतीय समुदाय अधिक सक्षम होत असल्याचे पाहून आम्हाला खूप अभिमान वाटत असल्याचे इंडियास्पोराचे संस्थापक एम रंगास्वामी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - पॅरिस करारात अमेरिकेचा पुन्हा अधिकृतरित्या प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.