इंदौर India vs Australia 2nd ODI : भारतानं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 33 षटकांत 317 धावांचे आव्हान होतं. पण भारतीय गोलंदाजांनी कांगारूंना 217 धावांत गुंडाळलं. भारतानं हा सामना 99 धावांनी जिंकलाय. भारताकडून अश्विननं 3, जडेजानं 3 बळी घेतले. त्यांना प्रसिद्ध कृष्णानं 2, शमीनं 1 बळी घेत चांगली साथ दिली. कांगारूंकडून एबॉटनं 54 तर, वॉर्नरने 53 धावा केल्या.
-
A thorough all-round performance 👊
— ICC (@ICC) September 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
India take an unassailable 2-0 series lead against Australia with a big win in Indore 👏
📝 #INDvAUS: https://t.co/pO3kSaXW6C pic.twitter.com/MlSxsRVvxN
">A thorough all-round performance 👊
— ICC (@ICC) September 24, 2023
India take an unassailable 2-0 series lead against Australia with a big win in Indore 👏
📝 #INDvAUS: https://t.co/pO3kSaXW6C pic.twitter.com/MlSxsRVvxNA thorough all-round performance 👊
— ICC (@ICC) September 24, 2023
India take an unassailable 2-0 series lead against Australia with a big win in Indore 👏
📝 #INDvAUS: https://t.co/pO3kSaXW6C pic.twitter.com/MlSxsRVvxN
कांगारूंना 213 धावांतच गुंडाळलं : या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतानं 50 षटकांत 5 गडी गमावून 399 धावा केल्या. मात्र, पावसामुळं ऑस्ट्रेलियाच्या डावात अडथळा निर्माण झाला. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार 33 षटकांत 317 धावांचं लक्ष्य मिळालं. यानंतर कांगारूंचा डाव 28.2 षटकांत 213 धावांतच गुंडाळला.
भारताच्या 50 षटकांत 5 बाद 399 धावा : तत्पूर्वी, भारतानं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 399 धावा केल्या होत्या. भारताकडून श्रेयस अय्यरनं 105, शुभमन गिलनं 104 धावा केल्या. या दोघांशिवाय सूर्यकुमार यादवनं नाबाद 72 धावा केल्या. कर्णधार केएल राहुलनं 52 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान अष्टपैलू कॅमेरून ग्रीननं 2 बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाला 317 धावांचं लक्ष्य : सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी कांगारूंसमोर 400 धावांचे लक्ष्य होतं. मात्र पावसानं मध्यंतरी सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळं डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 33 षटकांत 317 धावांचं लक्ष्य मिळालं. प्रत्युत्तरात संपूर्ण संघ अवघ्या 217 धावांत गारद झाला. संघाकडून शॉन ॲबॉटनं 54, डेव्हिड वॉर्नरनं 53 धावा केल्या. भारताकडून अश्विन, जडेजानं प्रत्येकी 3 बळी घेतले. कृष्णाला २ बळी मिळाले.
इंदूरमध्ये भारताचा हा सलग सातवा विजय : इंदूरमध्ये भारताचा हा सलग सातवा विजय आहे. 2006 मध्ये, भारत प्रथमच येथे एकदिवसीय सामना खेळला. सात वनडे सामन्यांमध्ये भारताला कधीही पराभवाचा सामना करावा लागला नाही. दरम्यान, इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात विजय मिळालाय. 2017 मध्ये टीम इंडियानं कांगारूंचा 5 गडी राखून पराभव केला होता.
सूर्याचं सलग दुसरं अर्धशतक : सूर्यकुमार यादवने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. सूर्याचे हे चौथे एकदिवसीय अर्धशतक आहे. त्याने 72 धावांची नाबाद खेळी केली. त्याने 37 चेंडूत 194.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. सूर्याच्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.
केएल राहुलचं अर्धशतक : कर्णधार केएल राहुलने अर्धशतक झळकावले. त्याने आपले 15 वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले. राहुल 52 धावा करून बाद झाला. त्याने 38 चेंडूत 136.84 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. राहुलच्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
गिलचं शतक : सलामीवीर शुभमन गिलने आपल्या वनडे कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. त्याने वर्षातील ५वे शतक झळकावले. गिल 104 धावा करून बाद झाला. त्याने 97 चेंडूत 107.21 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
अय्यरचं 88 चेंडूत शतक : तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या श्रेयस अय्यरने वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. तो 90 चेंडूत 105 धावा काढून बाद झाला. अय्यरच्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
प्लेईंग इलेव्हन :
भारत : शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, विकटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शामी
ऑस्ट्रेलिया : डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, कॅमरुन ग्रीन, जोश इंग्लिश (विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, सीन एबॉट, अॅडम जम्पा, जोश हेजलवूड, स्पेंसर जॉनसन
हेही वाचा -