नवी दिल्ली: भारतात कोरोना रुग्णांमध्ये गेल्या 24 तासांत मोठी घट झाली असून 2 लाख 55 हजार 874 नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत, कालच्या 3.06 लाख रुग्णांच्या तुलनेत 50 हजार 190 म्हणजेच 16 टक्यांनी कमी आहेत. गेल्या पाच दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती.
पाॅझिटिव्हीटी रेट देखील सोमवारच्या 20.75 टक्क्यांवरून 15.52 टक्क्यांवर आला आहे. तर साप्ताहिक पाॅझिटिव्हीटी रेट 17.17 टक्के नोंदवला गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या 614 मृत्यूची नोंद झाली. नवीन मृत्यूची भर पडल्याने आकडा आता 4 लाख 90 हजार 462 वर पोहोचला आहे.
कोरोना सक्रिय रुग्णांचा आकडा सध्या 22 लाख 36 हजार 842 वर पोहोचला आहे, जो देशातील एकूण कोरोना रुग्णां पैकी 5.62 टक्के आहे. गेल्या 24 तासात 2 लाख 67 हजार 753 रुग्ण बरे झाले असुन बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 3 कोटी 70 लाख 71 हजार 898 झाली आहे. परिणामी, भारताचा रिकव्हरी रेट 93.15 टक्के इतका झाला आहे.
तसेच याच कालावधीत देशभरात एकूण 16 लाख 49 हजार 108 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 71.88 कोटी चाचण्या केल्या आहेत. भारतातील लसीकरणाचा आकडा मंगळवारी सकाळपर्यंत 162.77 कोटींवर पोहोचला आहे. त्यापैकी ९३.०१ कोटी लोकांना लसीचा पहिला डोस तर ६८.८८ कोटी लोकांचे पूर्ण लसीकरण करण्यात आले आहे.